जागेचा वाद; एकास मारहाण

By Admin | Updated: January 10, 2017 02:30 IST2017-01-10T02:30:14+5:302017-01-10T02:30:14+5:30

जिल्हा परिषद कॉलनीतील घटना; गुन्हा दाखल

Space dispute; Single assault | जागेचा वाद; एकास मारहाण

जागेचा वाद; एकास मारहाण

अकोला, दि. ९- खडकी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनी येथे जागेतील बांधकामावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर एकास मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी एक ाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद कॉलनी येथील रहिवासी अनिल प्रल्हाद कळसकर हे काही कामानिमित्त रविवारी बाहेरगावी गेले होते, सोमवारी ते परत आले असता त्यांच्या जागेत सुनील कळसकर यांनी बांधकाम केल्याचे समोर आले. या प्रकाराची विचारणा त्यांनी सुनील कळसकर यांना केल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादातच सुनील कळसकर याने अनिल कळसकर यांना वीट मारल्याने ते जखमी झाले. त्यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनीलविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Space dispute; Single assault