जागा ८00, ऑनलाइन प्रवेश अर्ज केवळ दोन!

By Admin | Updated: July 25, 2016 01:57 IST2016-07-25T01:57:03+5:302016-07-25T01:57:03+5:30

डी.एल.एड. प्रवेश अर्ज करण्यासाठी ३१ जुलै अंतिम मुदत.

Space 800, only two online access applications! | जागा ८00, ऑनलाइन प्रवेश अर्ज केवळ दोन!

जागा ८00, ऑनलाइन प्रवेश अर्ज केवळ दोन!

अकोला: सन २0१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी अनुदानित, मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित तसेच बिगर अल्पसंख्याक अध्यापक महाविद्यालयांच्या शासकीय कोट्यातील डी.एल.एड. अभ्यासक्रमाच्या जागांसाठी २१ जुलैपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना ३१ जुलैपयर्ंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
जिल्हय़ातील १७ अध्यापक महाविद्यालयांमध्ये ८00 जागा असून, या जागांसाठी आतापर्यंत केवळ दोनच ऑनलाइन प्रवेश अर्ज प्राप्त झाले आहेत. शासनाने शिक्षक भरती बंद केली असल्यामुळे आणि टीईटी परीक्षा सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांचा डीएलएडकडे ओढा कमी झाला आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी डीएलएडला प्रवेश मिळत नव्हता. परंतु, आज जिल्हय़ातील अध्यापक महाविद्यालयांमधील शेकडो जागा रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. २१ जुलैपासून डीएलएड प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, विद्यार्थी डीएलएड अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहेत. जिल्हय़ातील तीन शासकीय अध्यापक महाविद्यालये आहेत. १४ खासगी विनाअनुदानित अध्यापक महाविद्यालये आहेत. प्रत्येक महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ५0, तर काही महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ५0 पेक्षा अधिक आहे.
१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पडताळणी
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (पुणे) तर्फे डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात प्राप्त वेळापत्रकानुसार, शासकीय कोट्यातील डी.एल.एड. (जुने नाव डी.एड.) प्रवेशासाठी २१ ते ३१ जुलैदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील. तसेच २१ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्ह्यासाठी निश्‍चितकेलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालय याठिकाणी अर्जाची पडताळणी करावी लागेल.  

Web Title: Space 800, only two online access applications!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.