शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

सोयाबीनचे दर वाढले; प्रतिक्विंटल २,८२५ रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 7:18 PM

सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून, हे दर प्रतिक्विंटल २,८२५ रुपयांपर्यंत पोहोचले. केंद्र शासनाने सर्वच प्रकारच्या खाद्य तेल आयातीवर शुल्क वाढ केल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे; पण बाजारातील सोयाबीनची आवक मात्र घटली आहे.

ठळक मुद्देतेलाच्या आयातीवर शुल्क वाढसोयाबीनची आवक घटली

राजरत्न सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली असून, हे दर प्रतिक्विंटल २,८२५ रुपयांपर्यंत पोहोचले. केंद्र शासनाने सर्वच प्रकारच्या खाद्य तेल आयातीवर शुल्क वाढ केल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापार्‍यांचे मत आहे; पण बाजारातील सोयाबीनची आवक मात्र घटली आहे.यावर्षी राज्यात ३७ लाखांवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर आहे. विदर्भात सुरुवातीला पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला. अनेक भागात एकरी ३ ते ४ क्विंटल उतारा येत असून, काढणीचे दर मात्र यावर्षी प्रचंड वाढल्याने शेकडो शेतकर्‍यांनी शेतातून सोयाबीन न काढता शेत नागरल्याचे प्रकार घडले.दरम्यान, यावर्षी सोयाबीनचे हमीदर २ हजार ८५0 रुपये आहेत. २00 रुपये बोनस मिळून शेतकर्‍यांना ३ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल मिळणार आहेत; पण काढणी हंगामाच्या सुरुवातीला बाजारात दोन हजार रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे सोयाबीनची खरेदी करण्यात आली होती. हातात पैसाच नसल्याने अल्पभूधारक शेतकर्‍यांनी सुरुवातीलाच सोयाबीनची विक्री केली. तेव्हा बाजारात दररोज सात ते आठ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होते. आजमितीस दोन हजार ते दोन हजार पाचशे क्विंटलची आवक सुरू  आहे. राज्यात सोयाबीनची सर्वाधिक उलाढाल असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजमितीस दररोज २ ते २ हजार ५00 क्विंटलची आवक सुरू  आहे. शुक्रवारी ही आवक २,५२३ क्विंटल होती. यामध्ये दररोज घसरण होत आहे. शुक्रवारी या बाजारात सोयाबीनचे सर्वाधिक दर प्रतिक्विंटल २,८२५ तर सरासरी दर २,६४0 पर्यंत पोहोचले होते. या हंगामातील हे दर सर्वाधिक आहेत.

अल्पभूधारक दरापासून वंचितअल्पभूधारक शेतकर्‍यांनी अगोदरच सोयाबीन विकल्यानंतर आता सोयाबीनच्या दरात सुधारणा होत आहे. तेल आयातीवर सुरुवातीलाच शुल्क वाढवले असते, तर अल्पभूधारक शेतकर्‍यांनाही दराचा फायदा झाला असता, अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांमध्ये उमटत आहेत.

तेलाच्या आयातीवर शुल्क वाढविल्याने सोयाबीन दरात वाढ झाली असून, या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. - वसंत बाछुका, तेल, कापूस उद्योजक, अकोला.

टॅग्स :Akola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समितीagricultureशेतीAkola cityअकोला शहर