सोयाबीनच्या दरात चढ-उतार; आवक घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 10:52 AM2019-11-27T10:52:17+5:302019-11-27T10:52:27+5:30

प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २,८५० रुपये दर दिले जात आहेत.

Soybean prices fluctuate; Incoming dropped! | सोयाबीनच्या दरात चढ-उतार; आवक घटली!

सोयाबीनच्या दरात चढ-उतार; आवक घटली!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू असून, सोमवारी प्रतिक्विंटल सरासरी ३,५५० रुपये असलेले हे दर मंगळवारी १५० रुपयाने वाढून ३,७०० रुपयांपर्यंत वाढले आहेत; परंतु प्रतवारीचे निकष लावून खरेदी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात २,८५० रुपये दर दिले जात आहेत. बाजारातील सोयाबीनचीआवकही घटली आहे.
गत आठवड्यात अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज ७ हजार क्विंटलवर आवक सुरू होती. या आठवड्यात आवक घटली असून, सरासरी दररोज ४,५०० क्विंटल आवक आहे.
अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी सोयाबीनची ४,५९५ क्विंटल आवक होती. दर सरासरी प्रतिक्विंटल ३,७०० रुपये जास्तीत जास्त ३,८०० तर कमीत कमी दर २,८५० रुपये होते. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ४४५ क्विंटल आवक होती. प्रतिक्विंटल कमीत कमी दर २,७५० तर जास्तीत जास्त दर हे ३,८१५ रुपये होते. जास्तीचे दर हे चांगले व पिवळ््या सोयाबीनला दिले जात आहेत. यावर्षी अतिपावसाने सोयाबीन काळे पडले असून, प्रतवारी घसरल्याच्या नावाखाली बाजारात सोयाबीनला कमीत कमी दर दिले जात आहेत.
अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक वाढली आहे. मंंगळवारी ही आवक १,११९ क्विंटल होती. प्रतिक्विंटल सरासरी दर १,३४० रुपये आहेत.

Web Title: Soybean prices fluctuate; Incoming dropped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.