सोयाबीनच्या दरात मोठी घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 12:09 PM2020-03-20T12:09:34+5:302020-03-20T12:09:41+5:30

उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Soybean prices drop sharply! | सोयाबीनच्या दरात मोठी घट!

सोयाबीनच्या दरात मोठी घट!

Next

अकोला : यावर्षी केंद्र शासनाने सोयाबीनला प्रतिक्विंटल ३ हजार ७१० रुपये हमीदर जाहीर केले;पण आजमितीस बाजारात दर कोसळले आहेत. शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना हमीपेक्षा ६०० ते ९०० रुपये इतक्या कमी दराने बाजारात सोयाबीन विक्री करावी लागत आहे. यावर्षी उतारा घटल्याने या दरात उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
यावर्षी अति पावसाचा सोयाबीन पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून, त्यामुळे विदर्भात उत्पादन घटले आहे. सोयाबीन काळेदेखील पडले. अनेक भागात हे उत्पादन एकरी ४ ते ५ क्ंिवटलपर्यंतच होते. अकोला जिल्ह्यात अनेक भागात कमी उतारा लागला; पण काढणी हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी प्रतिक्ंिवटल १,८०० ते दोन हजार रुपये दराने सोयाबीन विक्री करावी लागली. एक महिन्यानंतर सोयाबीनच्या दरात वाढ झाली. जवळपास ४ ते ४ हजार २०० रुपयांपर्यंत हे दर पोहोचले होते. तोटा मात्र सुरुवातीला विक्री करणाºया अल्पभूधारक शेतकºयांना झाला. सध्या दरात बरीच घट झाली असून, हे दर आणखी घटण्याचे संकेत व्यापारी वर्तुळातून प्राप्त होत आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी प्रतिक्ंिवटल ३,१५० आहेत. तरी कमीत कमी दर हे २,८०० रुपये आहेत.
 

मुगाच्या दरातही घट
यावर्षी मूग, उडीद पिकासही पावसाचा फटका बसल्याने या दोन्ही डाळवर्गीय पिकांचे उत्पादन नाममात्र आले आहे. यामध्ये आता मुगाचे दर वाढून प्रतिक्ंिवटल सरासरी ६,५०० हजार ते जास्तीत जास्त दर ७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. उडिदाचे सरासरी दर ३,५०० तर जास्तीत जास्त प्रतिक्ंिवटल ५,१५० रुपये आहेत. मुगाची आवक मात्र घटली आहे.

 

Web Title: Soybean prices drop sharply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.