सोयाबीन पडले पिवळे!

By Admin | Updated: September 7, 2014 01:34 IST2014-09-07T01:34:26+5:302014-09-07T01:34:26+5:30

विदर्भातील अठरा लाख हेक्टर सोयाबीन धोक्यात; शेतकर्‍यांसमोर नवे संकट

Soybean fell yellow! | सोयाबीन पडले पिवळे!

सोयाबीन पडले पिवळे!

अकोला : अगोदर अपुर्‍या पावसामुळे पेरणीला विलंब झाला; आता आलेली सोयाबीनची झाडे पिवळी पडल्याने विदर्भातील अठरा लाख हेक्टर सोयाबीन धोक्यात असून, अनेक ठिकाणी हे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने, अगोदरच दुबार-तिबार पेरणी करू न प्रचंड आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकर्‍यांपुढे हे नवे अस्मानी संकट उभे ठाकले आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्हय़ा तील बहुतांश ठिकाणी सोयाबीन पिवळे पडले आहे. याची अनेक कारणे सांगितली जात असून, मूळकुज व पिवळा मौझैक या रोगांचा प्रादुर्भाव तर झाला नसावा, या भीतीने शेतकरी घाबरला आहे. कारण या अगोदरच दुबार-तिबार पेरणी करू न विविध किडींचे व्यवस्थान करणारा हा शेतकरी प्रंचड आर्थिक अडचणीत सापडला असून, आता हे नवे संकट त्याच्यासमोर उभे ठाकले आहे. दरम्यान, शेकडो शेतकर्‍यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडे प्रा ितनिधिक झाडांचे नुमने पाठविले आहेत. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ही झाडे पिवळी पडण्यामागील अनेक कारणे सांगितली असून, यामध्ये मुख्यत्वे सद्यस्थितीत जमिनीत अधिक ओलावा असल्यामुळे झाडांच्या मुळांना श्‍वासोच्छ्वास घेण्यास अडथळा येतो. यामुळे झाडांना जमिनीतील पोषण द्रव्य शोषून घेता येत नसल्याने अनेक पाने पिवळी पडतात. सद्यस्थितीत जमिनीत अधिक ओलावा असून, सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे झाडांच्या मुळांना सूर्यप्रकाश मिळत नसल्याने सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. परंतु वातावरणात बदल झाल्यानंतर मात्र ही परिस्थिती निवळण्यास मदत होणार असल्याची अ पेक्षा प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावतीचे प्रमुख डॉ. सी.यू. पाटील यांनी व्यक्त केली.

** झाडे पिवळी का पडतात?

ओलावा अधिक वाढल्यास किंवा ज्या जमिनीचा सामू अधिक अम्लधर्मीय असतो, अशा जमिनीत ओलावा अधिक असल्याने पाने पिवळी पडतात. तसेच ढगाळ वातावरणामुळे प्रकाशसंश्लेषण होत नसल्याने पाने पिवळी पडतात किंवा पिवळा मोझैक या रोगामुळेसुद्धा पाने पिवळी पडण्याचे प्रकार घडतात; परंतु या रोगामुळे पानावर हिरव्या-पिवळ्य़ा चट्टय़ाचे मिश्रण आढळते. विशेष म्हणून मूळकुज या रोगाच्या प्रादुर्भावाने पाने पिवळी होतात.

** उपाययोजना आवश्यक!

पिवळे पडलेल्या सोयाबीनची उपाययोजना न केल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची श क्यता असते. त्यामुळे ज्या शेतात पाणी साचलेले असेल तेथे चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढण्याची गरज आहे. पीक ३0 ते ३५ दिवसाचे असल्यास डवरणी करावी, फुलोर्‍यावर असल्यास डवरणी करू नये, नत्राची कमतरता असल्यास युरियाची २ टक्के अर्थात २ किलो १00 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

** पिवळा मोझैकवरील व्यवस्थापन

पिवळा मोझैक या रोगाच्या व्यवस्थापनाकरिता मिथील डेमेटोन १0 मि.ली. किंवा डायमि थोएट १0 मिली किं वा थायोमिथोक्जम २ ग्रॅम १0 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Web Title: Soybean fell yellow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.