सोयाबीन चोरटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 03:23 IST2016-10-30T03:23:03+5:302016-10-30T03:23:03+5:30
चोरट्याकडून १५ पोते सोयाबीन हस्तगत; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी.
_ns.jpg)
सोयाबीन चोरटा गजाआड
अकोला, दि. २९- सांगवी येथील शेतकर्याचे सोयाबीनचे १५ पोते चोरणार्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी शनिवारी सकाळीच अटक केली. चोरट्याकडून १५ पोते सोयाबीन हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सांगवी येथील रहिवासी वामनराव इंगळे यांच्या शेतातील १५ पोते सोयाबीन चोरीला गेले होते. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दोन दिवसातच या प्रकरणातील आरोपी भोळ येथील रहिवासी दत्ता दामोदर पदमने याला शनिवारी भोळ येथूनच अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने सोयाबीनचे पोते ज्या ठिकाणी लपविले होते त्याचीही माहिती पोलिसांना दिली. अकोट फैल पोलिसांनी १५ पोते सोयाबीन हस्तगत केले असून आरोपीस अटक केली. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल ठाकरे, तिरुपती राणे, एएसआय प्रकाश चौधरी, शेर अली, अश्वीन शिरसाट, राजाभाऊ वानखडे, फिरोज खान, विजय चव्हाण यांनी केली.