सोयाबीनवर शेंगा पोखरणा-या किडींचा हल्ला!

By Admin | Updated: September 2, 2015 23:42 IST2015-09-02T23:42:26+5:302015-09-02T23:42:26+5:30

कीटकनाशकांचा खर्च वाढला; शेतकरी हवालदिल.

Soya bean piggery insects attack! | सोयाबीनवर शेंगा पोखरणा-या किडींचा हल्ला!

सोयाबीनवर शेंगा पोखरणा-या किडींचा हल्ला!

अकोला : सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणार्‍या अळीने हल्ला चढवला असून, प्रतिकूल हवामानात टिकू न असलेल्या सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. या अळ्य़ांचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकांच्या खर्चात वाढ होत असल्याने वर्‍हाडातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेगा पोंखरणारी अळी मजबूत बांध्याची, काळी पिवळसर, हिरव्या रंगाची आहे. बाहेरुन निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. अंडीतून बाहेर पडलेली लहान अळी सोयाबीनची कोवळी पाने खाते. पीक फुलोर्‍यावर आल्यानंतर कळ्य़ा, फुले फस्त करते, शेंगा आल्यावर या शेंगावर अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून आत शिरते. शेगांतील अरिपक्व तसेच परिपक्व झालेले दाणे खाते. सध्या या किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, ही कीड शेंगा पोखरू न शेंगामधील दाणे झपाट्याने खाऊन टाकत असल्याने शेतकरी सध्या त्रस्त आहे. या किडीला हिरवी अमेरिकन बोंडअळी, घाटे अळी या नावाने ओळखले जाते. ही अळी बहुभक्षी असून, तूर, हरभरा, वटाणा, मूग, उडीद, मसूर, सोयाबीन, चवळी या कडधान्यावर मोठय़ा प्रमाणात आढळून येते. या शिवाय कपाशी, ज्वारी, टमाटे, तंबाखू, सुर्यफूल, करडई या पिकावरही या अळीचा प्रादुर्भाव होतो. विदर्भात जवळपास १८ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी शेतकर्‍यांनी केली आहे; पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकर्‍यांसमोर या किडीचे नवे संकट उभे ठाकले आहे.

Web Title: Soya bean piggery insects attack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.