सोयाबीनने व-हाडातील शेतक-यांना केले गारद !

By Admin | Updated: October 16, 2014 00:57 IST2014-10-16T00:11:41+5:302014-10-16T00:57:48+5:30

एकरी सरासरी दोन क्विंटल उत्पादन; पण दाणे निघाले अपरिपक्कव; पेरणीचा निम्मा खर्च निघणे कठीण.

Soya bean gardens to farmers in va-bone! | सोयाबीनने व-हाडातील शेतक-यांना केले गारद !

सोयाबीनने व-हाडातील शेतक-यांना केले गारद !

राजरत्न सिरसाट/ अकोला
विदर्भातील वीस लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक हातचे गेले असून, एकरी सरासरी दोन िक्ंवटल उत्पादन होत नसल्याचे पाहून शेतकरी गारद झाला आहे. पेरणीचा खर्च तर निघणारच नाही, सोयाबीन काढणीचा खर्चही पेलवत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.
यावर्षी दोन महिने उशिरा पाऊस आल्याने पेरण्यांना विलंब झाला. या प्रतिकुल परिस्थि तीमध्येही शेतकर्‍यांनी पश्‍चिम विदर्भात १५.५0 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली. ऑगस्ट व सप्टेबर महिन्यात सुरू वातीचे दोन दिवस १२४ व ९0 मि.मी. पाऊस झाला; पंरतु त्यांनतर पावसाने दडी मारल्याने पिकांवर परिणाम झाला. अनेक किडींनी िपकाला ग्रासले, रसशोषण करणार्‍या कीडी प्रामुख्याने कापसावर हल्ला करतात; परंतु यावर्षी प्रथमच या किडीने सोयाबीन पिकावर हल्ला केला. त्यामुळे अचानक पिके वाळली, पाने पिवळी पडली. परिपक्वतेच्या अवस्थेत आलेल्या या पिकाला पाण्याची नितांत गरज होती; परंतु यावर्षी पाऊस तर नव्हताच आणि परतीच्या पावसानेदेखील पाठ फिरविल्याने पिकाचे दाणे भरले नाहीत. त्यामुळे उत्पादन घटले असून, सोयाबीनचे हे पिक अपरिपक्वअवस्थेतच पूर्ण वाळले आहे. या परिस्थितीने शेतकरी गारद झाला असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
यावर्षी पावसाअभावी पेरणी उशिरा झाली आणि नंतर परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाने दडी मारली. प्रथमच या पिकावर रसशोषण करणार्‍या किडीचाही प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनला फटका बसला असून, उत्पादन घटले आहे. परिणामी अनेक ठिकाणी एकरी दोन ते तीन क्विंटलच्यावर उत्पादन होत नसल्याचे चित्र आहे. जिथे संरक्षित सिंचनाची व्यवस्था होती, तिथे सोयाबीन चांगले आले; परंतु हे प्रमाण एक टक्कयाच्यावर नसल्याचे प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ.सी.यु.पाटील यांनी स्पष्ट केले.

*मशागत ते पेरणीचा खर्च एकरी पंधरा हजार
शेतीची मशागत ते पेरणीचा खर्च सरासरी पंधरा हजार रू पये येतो. यावर्षी तर दुबार, तिबार पेरणी आणि किटकनाशकांचा खर्च वाढल्याने शेतकर्‍यांचे बजेट कोलमडले. यंदा सोयाबीनला ३२00 रू पये प्रति क्विंटल हमी भाव आहे. बाजारपेठेत कमाल भाव ३५00 रू पये प्रति क्विंटल आहे. यावर्षी एकरी सरासरी दोन क्विंटल उत्पादन होत आहे आणि दाणे परिपक्वनसल्याने भावात घसरण झाली आहे. मळणी आणि काढणीचा खर्च दोन हजार रू पये आहे. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

*शेतकर्‍यांवर मोठं संकट
यावर्षी मूग, उडीद हे पीक शेतकर्‍यांना घेता आले नाही, कापूस हे पीक शेतकर्‍यांनी कमी केले आहे. सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती; तथापि या पिकाने शेतकर्‍यांची घोर निराशा केली आहे. सोयाबीन काढणीचा खर्च एकरी १६00 रूपये आणि मळणीचा खर्च प्रति िक्ंवटल ३00 रूपये आहे. हमी भाव प्रति क्विंटल ३२00 रूपये असले तरी सध्या बाजारात २९00 रू पये प्रतिक्विंटल भाव आहेत. त्यामुळे सोयाबीन काढणेदेखील कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. ते नुकसान यापेक्षा जास्त आहे.

Web Title: Soya bean gardens to farmers in va-bone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.