शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:44 IST

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

- राजारत्न सिरसाट

अकोला : विदर्भात मान्सूनचा प्रवेश झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले; पण तो गेला कु ठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. १६ जून रोजी विदर्भात काही भागात पाऊस झाला, तेव्हापासून सार्वत्रिक पाऊसच झाला नसल्याने विदर्भातील ४९ लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत.राज्यात १४०.६९ ला, हेक्टर तर विदर्भात यातील ४९ लाख हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. १६ जून रोजी विदर्भासह राज्यातील काही भागात पाऊस पडला. पुन्हा पाऊस येईल, या आशेवर शेतकºयांनी बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. काही शेतकºयांनी पेरणीसुद्धा केली. १८ जूनपर्यंत १४०.६९ लाख हेक्टरपैकी ०.३९ लाख हेक्टर ०.२८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. सार्वत्रिक पाऊसच होत नसल्याने शेतकºयांनी पेरण्या थांबविल्या आहेत. अमरावती विभागात ३२ लाख हेक्टरपैकी आजमितीस केवळ ३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या तीन टक्क्यांमध्ये कापूस बियाणे पेरणी शेतकºयांनी केली. नागपूर विभागात तर एक टक्का पेरणी झाली नाही. नागपूर व वर्धा जिल्ह्यात काही भागात पाऊस झाल्याने शेतकºयांनी कापसाची धूळ पेरणी केली. ज्या शेतकºयांकडे संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यातील दोन-चार शेतकºयांनी भाताची रोपवाटिका टाकली.दरम्यान, राज्यातील चित्र बघितल्यास खरीप हंगामातील पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत, तर कोल्हापूर विभागात भात पिकाच्या धूळवाफ पेरणीची कामे सुरू झाली. सांगली जिल्ह्यात ७,६९७ तर कोल्हापूर जिल्ह्यात ११,९०० हेक्टरवर पेरणी झाली. सांगली जिल्ह्यात यावर्षी १३७ हेक्टरवर शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली. ठाणे व पुणे विभागात १०,१२५ हेक्टरवर भात व ३२९ हेक्टरवर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली, तसेच ६८६ हेक्टरवर नाचणी रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली. कोकणात ठाणे ८६ हेक्टर, पालघर १०४ हेक्टर, रायगड २,६३९ हेक्टर, रत्नागिरी ४,८४७ हेक्टर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात २,४४९ हेक्टर भात रोपवाटिकेतील पेरणीची कामे झाली आहेत.

- दोन वर्षांपासून पूर्वेकडून मान्सून!अरबी समुद्राकडून येणारा मान्सून हा स्थिर व कायम असतो. तथापि, विदर्भात गत दोन वर्षांपासून बंगालच्या उपसागराकडून मान्सून प्रवेश करीत आहे. त्यामुळे शेतकºयांनी पेरणी करताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांकरवी शेतकºयांना सल्ला दिला जात आहे.- पश्चिम विदर्भात केवळ ३ टक्के कापूस बियाणे पेरणी झाली आहे.शेतकºयांना दमदार सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा आहे.सुभाष नागरे,विभागीय कृषी सह संचालक,अमरावती.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसFarmerशेतकरी