पेरण्या उशिरा ; पीक विमा काढण्यास हवी मुदतवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:19+5:302021-07-16T04:14:19+5:30
अकोला: पावसात खंड पडल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिराने होत असून, अद्यापही पेरण्या सुरुच आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक ...

पेरण्या उशिरा ; पीक विमा काढण्यास हवी मुदतवाढ !
अकोला: पावसात खंड पडल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिराने होत असून, अद्यापही पेरण्या सुरुच आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढण्यासाठी देण्यात आलेली १५ जुलैपर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी अमरावती विभागासह राज्यातील विविध शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनामार्फत १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु वीस दिवसांपूर्वी पावसाने दांडी मारल्याने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह राज्यातील विविध भागात खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या होत्या. गत चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने, रखडलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी सुरु केल्या आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिरा होत असल्याने आणि अद्यापही पेरण्या सुरुच असल्याच्या पार्श्वभूमीवर पीक विमा योजनेत १५ जुलैपर्यंतच्या मुदतीत पिकांचा विमा काढणे शेतकऱ्यांसाठी कठीण झाले आहे. त्याअनुषंगाने पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे केली जात आहे.
पावसात खंड पडल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या उशिरा होत आहेत. गत चार पाच दिवसांपासून पाऊस सुरु झाल्याने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रखडलेल्या पेरण्या सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शंकर तोटावार
विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.