अकोल्यात अवैध गुटख्याचा साठा जप्त
By Admin | Updated: September 11, 2014 01:14 IST2014-09-11T01:14:15+5:302014-09-11T01:14:15+5:30
अकोला येथे दोन लाखाचा गुटखा जप्त; ; दोन युवक गजाआड.

अकोल्यात अवैध गुटख्याचा साठा जप्त
अकोला : चवरे प्लॉटमधील घरावर छापा घालून पोलिसांनी ितसर्या माळय़ावर लपवून ठेवलेल्या अवैध गुटखा साठा जप्त केला. जप्त केलेल्या गुटख्याची किंमत २ लाख रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन युवकांना गजाआड केले.
रोहित रमेश साहू (२४) आणि अर्जुन पारसनाथ साहू (२५) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी गत काही महिन्यांपासून काळय़ा बाजारात हा गुटखा विकत असल्याचीही माहिती आहे. गत काही दिवसांपासून पोलिस साहू बंधूंच्या मागावर होते.