‘नासा’च्या संशोधन केंद्रात प्रशिक्षणासाठी सोनलची निवड
By Admin | Updated: July 12, 2016 01:23 IST2016-07-12T01:23:43+5:302016-07-12T01:23:43+5:30
‘लायन्स’ने दिला मदतीचा हात : देशातील पंधरा निवडक विद्यार्थ्यांमध्ये समावेश.

‘नासा’च्या संशोधन केंद्रात प्रशिक्षणासाठी सोनलची निवड
अकोला: जगातील सर्वोच्च अंतराळ संशोधन संस्था म्हटल्या जाणार्या अमेरिकेच्या नासा या संस्थेत अकोल्याची विद्यार्थिनी सोनल बबेरवाल हिची नासा रोव्हर्स चालेंज या अंतराळ संशोधन व प्रशिक्षण उपक्रमासाठी निवड झाली आहे. सोनल ही देशामधील पंधरा विद्यार्थ्यांमधील एक असून, ती स्थानिक कारमेल शाळेची विद्यार्थिनी असल्याची माहिती प्राचार्य फादर म्यॅथु यांनी 'लोकमत'ला दिली.
आपणांस भविष्यात अंतराळवीर कल्पना चावलासारखी गगन भरारी घ्यायची असल्याचा सोनलाचा मनोदय आहे. सोनल हिची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिच्या या आगळय़ावेगळ्या उपक्रमासाठी ह्यलायन्स कॉटन सिटीह्णने तिला मदतीचा हात दिला आहे. या अनुसंधानासाठी तिला संस्थेच्यावतीने तीस हजाराचे साहाय्य करण्यात आले. अकोला महानगराची ही कन्या या शहराचे नाव करणार असल्याचा विश्वास लिओ डिस्ट्रिक्ट चेरपर्सन कौशल भाटिया यांनी यावेळी व्यक्त करून स्वयंसेवी संस्थांनी तिला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले. 'लायन्स कॉटन सिटी'च्या एका सोहळ्यात सोनल हिला सहाय्यता राशी प्रदान करण्यात आली.