सोमनाथ शेटे यांनी स्वीकारला पदभार
By Admin | Updated: February 12, 2015 01:14 IST2015-02-12T01:14:56+5:302015-02-12T01:14:56+5:30
सोमनाथ शेटे अकोला मनपाचे नवे आयुक्त.

सोमनाथ शेटे यांनी स्वीकारला पदभार
अकोला: महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार सोमनाथ शेटे यांनी बुधवारी सकाळी स्वीकारला. आयुक्तपदावर रुजू होण्यापूर्वी शेटे यांचे प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांची २0 जानेवारी रोजी नागपूर येथे बदली झाली. तत्पूर्वी आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मागील दीड वर्षांपासून मनपाकडे विविध विकास कामांसाठी १0७ कोटी रुपयांचा निधी पडून असताना अधिकार्यांच्या उदासीन धोरणामुळे विकास कामे प्रलंबित आहेत. अशावेळी मनपाच्या आयुक्तपदी सक्षम अधिकार्यांची नियुक्ती व्हावी, अशी नगरसेवकांची अपेक्षा होती. वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ शेटे यांची आयुक्तपदावर बदलीचे आदेश निघाल्यानंतर अकोलेकरांना त्यांची प्रतीक्षा होती. १0 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शेटे अकोल्यात दाखल झाले, तर ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी प्रभारी उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे यांनी त्यांचे स्वागत केले. यादरम्यान आयुक्त शेटे यांनी महापौर उज्ज्वला देशमुख यांची भेट घेऊन विविध मुद्यांवर चर्चा केली.