‘सोल्युलिबिलीटी कीटस’विनाच राबविला सिकलसेल सप्ताह
By Admin | Updated: December 25, 2014 00:59 IST2014-12-25T00:59:54+5:302014-12-25T00:59:54+5:30
राज्यात कुठेच पुरवठा नाही, वेळेवर राबविलेल्या कार्यक्रमाचा परिणाम.

‘सोल्युलिबिलीटी कीटस’विनाच राबविला सिकलसेल सप्ताह
सचिन राऊत / अकोला - राज्य सरकारने ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत राज्यातील २0 जिल्ह्यामध्ये सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम राबविला, मात्र यासाठी सर्वात महत्वाचा घटक असलेला बफर सोल्यूशनचा पुरवठाच झाला नसल्याने या कार्यक्रमाचा बट्टयाबोळ झाला आहे.
राज्यातील अकोला, ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदीया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलडाणा, वाशिम, नांदेड, औरंगाबाद, रायगड आणि हिंगोली या २0 जिल्हयामध्ये ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सिकलसेल नियंत्रण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहामध्ये सिकलसेल रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक असणार्या सोल्युबिलीटी टेस्ट कीटस सिकलसेल नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यालयाक डे कार्यक्रम संपल्यावरही उपलब्ध झाल्या नसल्याने सर्वच ठिकाणी हा कार्यक्रम अडचणीत आला आहे. सोल्युबिलीटी टेस्ट कीटस पाठविने शासनाने बंद केले असून त्यावर तोडगा म्हणूण बफर सोल्यूशनव्दारे या चाचण्या करण्यास आरोग्य विभागाला सांगितले आहे. याबाबत शासनाने शासकीय वैैद्यकीय महाविद्यालयांना ६ डिसेंबर रोजी पत्र पाठवून बफर सोल्यूशनची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. मात्र एवढय़ा कमी वेळेत बफर सोल्यूशनची निर्मिती करणे कठीण असल्याने वैद्यकीय महाविद्यालयांनी बफर सोल्यूशनचा पुरवठा जिल्हा परिषद आरोग्य विभागाला केला नाही. या कारणामूळे सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम बारगळला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला बफर सोल्यूशनसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालयांनाही र्मयादा आल्याने त्यांच्याकडून हा पुरवठा करण्यात येत नसून परिणामी हा कार्यक्रमच प्रभावीत झाला आहे. ऐन वेळेवर नियोजन करुन कार्यक्रम राबविल्याने हा परिणाम झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.