शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 सोलापूर ते वाशिम; सदाभाऊंच्या दौऱ्यात ‘स्वाभिमानी’ची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 14:24 IST

 अकोला: कृषी व पणन राजमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चांगला पेटला आहे. शनिवारी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळ्या झेंड्यांसह गाजर दाखवून सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला.

ठळक मुद्देसदभाऊंना सत्तेचा मोह झाल्याचा आरोप संघटनेत होऊ लागला व त्यामधूनच खा. राजू शेट्टी व ना. खोतांचे संबंध ताणल्या गेले. दुसरीकडे ना. खोत यांनी रयत क्रांती आघाडी नावाने आपली स्वतंत्र संघटना स्थापन करून राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्याची सुरुवात केली. शेतकरी व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळे झेेंडे दाखवून विरोधाची धग वाशिममध्येही कायम असल्याचे दाखवून दिले.

- राजेश शेगोकार

 अकोला: कृषी व पणन राजमंत्री सदाभाऊ खोत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद आता चांगला पेटला आहे. शनिवारी सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळ्या झेंड्यांसह गाजर दाखवून सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला. त्यानंतर खा. राजू शेट्टी व खोत यांच्या कार्यकर्त्यांनी थेट तोडफोडीची भूमिका घेतली. सदाभाऊंच्या विरोधातील ही धग थेट वाशिमपर्यंत कायम राहिल्यामुळेच पोलिसांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाºयांना ना. खोतांच्या दौºयाआधीच नजरकैदेत टाकण्याचा पवित्रा घेतला.वर्षभरापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे क्रमांक दोनचे नेते असलेल्या सदभाऊंना सत्तेचा मोह झाल्याचा आरोप संघटनेत होऊ लागला व त्यामधूनच खा. राजू शेट्टी व ना. खोतांचे संबंध ताणल्या गेले. अखेर ना. खोतांची संघटनेतून हकालपट्टी झाली. दुसरीकडे ना. खोत यांनी रयत क्रांती आघाडी नावाने आपली स्वतंत्र संघटना स्थापन करून राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे उभारण्याची सुरुवात केली. आता या दोन्ही संघटनांमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाले आहे. स्वाभिमानीचे भक्कम अस्तित्व असलेल्या जिल्ह्यांमध्ये खोतांना होणारा स्वाभिमानीचा विरोधही तेवढाचा प्रभावी आहे, त्यामुळे पोलिसांनी आता दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरात परवा खोत-शेट्टी यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडल्याने थेट कार्यालयांची तोडफोड होण्यापर्यंतच वाद उभ्या महाराष्टÑाने पाहिला.या प्रकरणाची शाई वाळण्याच्या आतच मंगळवारी ना. खोत यांचा वाशिम दौरा झाला. या दौºयामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विघ्न आणू नये म्हणून पोलिसांनी आधीच प्रमुख कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले; मात्र शेतकरी व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी ना. खोतांना काळे झेेंडे दाखवून विरोधाची धग वाशिममध्येही कायम असल्याचे दाखवून दिले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाशिममध्ये आता चांगलाच जोर वाढत आहे. खुद्द खा. राजू शेट्टी व स्वाभिमानीचे युवा नेते, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत येथील संघटना चांगली बांधली आहे. आत्महत्या केलेले शेतकरी दत्ता लांडगे यांच्या कुटुंबीयांसाठी स्वाभिमानीने उभारलेला लढा असो की कापूस-सोयाबीन परिषद असो, अनेक कार्यक्रमांतून युवकांची मोठी फळी स्वाभिमानीने वाशिममध्ये उभारली आहे. त्यामुळेच ना. खोतांच्या दौºयाआधीच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीSolapurसोलापूरwashimवाशिम