मातीत फुंकले प्राण!
By Admin | Updated: September 28, 2014 01:43 IST2014-09-28T01:43:48+5:302014-09-28T01:43:48+5:30
क्ले मॉडेलिंग कलाप्रकारात अंकिताने मिळवले यश.

मातीत फुंकले प्राण!
अकोला : क्ले मॉडेलिंग (मातीपासून मूर्ती बनविणे) या आपल्याकडे फारसा प्रचलित नसलेल्या कलाप्रकारात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकं मिळविणार्या अंकिता पिंपळे यांचे यश व-हाडातील तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी आहे.
अकोला येथील रहिवासी असलेल्या अंकिता पिंपळे यांनी कॉम्प्यूटरमध्ये एम. एससी. केले. गत आठ वर्षांंपासून शिक्षण सुरू असताना पिंपळे यांनी क्ले मॉडेलिंग, ऑनस्पॉट पेन्टिंग, पोस्टर मेकिंग, कोलाज आदी कलाप्रकाराच्या स्पर्धांंमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. संगणक क्षेत्रात शिक्षण घेत असल्या तरी त्यांनी विविध क्ले मॉडेलिंगसह विविध कलाप्रकारात सहभाग घेण्याचा छंद जोपासला. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांंंमध्ये पदकं मिळविले.
त्यांनी नांदेड येथे पार पडलेल्या इंद्रधनुष्य कॉम्पिटेशनमध्ये भाग घेतला. यामध्ये संपूर्ण राज्यातील विद्यापीठातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत त्यांना कोलाजमध्ये पहिले बक्षीस मिळाले. त्यानंतर त्यांची निवड हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सेंट्रल झोन स्पर्धेकरिता झाली. यामध्ये त्यांनी ऑन स्पॉट पेंटिंग व कोलाज या कलाप्रकारात तिसरे बक्षीस मिळविले. त्यानंतर कोलकाता येथे झालेल्या नॅशनल युथ स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेतही कोलाज, पोस्टर पेंटिंग या कलाप्रकारात यांना बक्षीस मिळाले. पंजाबमधील फगवारा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स् पर्धेतही त्यांनी भाग घेतला. यामध्ये त्यांना विविध कलाप्रकारात बक्षीस मिळाले.
क्ले मॉडेलिंग हा प्रकार विदर्भात फारसा प्रचलित नसून, अनेकांना याबाबत माहितीही नाही. मात्र, त्यानंतरही पिंपळे यांनी यामध्ये प्रावीण्य प्राप्त केले आहे. त्यांचे यश पाहून या कलाप्रकाराला विदर्भात चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. नव्या पिढीने या कलेचे जतन करण्यासाठी पुढे यावे अशी अपेक्षा अंकिताने व्यक्त केली.