बाळापूर येथे समाजविरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST2021-02-23T04:28:47+5:302021-02-23T04:28:47+5:30

----------- वाचनालयात पुस्तकांचे वाटप बार्शिटाकळी : पिंजर येथील भाऊसाहेब लहाणे विद्यालय, धनेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज वाचनालय येथे शिवजयंतीनिमित्त ...

Socialists felicitated at Balapur | बाळापूर येथे समाजविरांचा सत्कार

बाळापूर येथे समाजविरांचा सत्कार

-----------

वाचनालयात पुस्तकांचे वाटप

बार्शिटाकळी : पिंजर येथील भाऊसाहेब लहाणे विद्यालय, धनेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज वाचनालय येथे शिवजयंतीनिमित्त पुस्तकांचे वाटप करण्यात आले, असे स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष प्रतीक ताले यांनी कळविले आहे.

----------

स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती साजरी

मूर्तिजापूर : स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार हरीश पिंपळे, दीपक दांदळे, कोमल तायडे, जयसिंगभाऊ तिडके, बबलूभाऊ ढोक, ॲड. गौरखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव मोरे यांनी केले होते.

-------

बालगृहात शालेय साहित्याचे वाटप

मूर्तिजापूर : नमो नमो मित्र परिवारातर्फे सूर्योदय बालगृह, अकोला येथे लहान मुलांसोबत व वृद्धांसोबत शिवजयंती साजरी करण्यात आली. मुलांना शिवरायांच्या कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलांना शालेय साहित्य व दैनंदिन जीवनात लागणारे अन्नधान्य देण्यात आले.

Web Title: Socialists felicitated at Balapur