शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सामाजिक दायित्व म्हणून प्रत्येकाने एक वृक्ष लावावा - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आवाहन  

By atul.jaiswal | Published: July 01, 2018 1:40 PM

वृक्षलागवडीच्या महत्वाकांक्षी संकल्पामध्ये मी सहभागी झालो आहे, आपणही वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील नागरीकांना यांनी केले.

ठळक मुद्दे१३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत रविवार, १ जुलै रोजी मोर्णा नदी काठी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.अकोला जिल्हयासाठी तब्बल १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीच उदिष्ट देण्यात आले आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसह सामान्य नागरिक, विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत.

अकोला : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने सामाजिक दायित्व म्हणून एक वृक्ष लावुन त्याचे संगोपन करुन ते जगवणे अत्यंत गरजेचे आहे,असे सांगुन वृक्षलागवडीच्या महत्वाकांक्षी संकल्पामध्ये मी सहभागी झालो आहे, आपणही वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील नागरीकांना यांनी केले. १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमातंर्गत रविवार, १ जुलै रोजी मोर्णा नदी काठी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपवनसंरक्षक एस.बी. वळवी, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी विजय माने, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, आदींसह मोठया संख्येने विविध महाविदयालयांचे विदयार्थी आणि नागरिक यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी यावेळी वृक्ष लागवड केली.महाराष्ट्र शासनाद्वारे लोकसहभागातून १ जुलै ते ३१ जुलै २०१८ दरम्यान १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. असा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. त्या संकल्पपुतीर्साठी ‘माझे एक झाड, मोर्णा काठी’ या उपक्रमातंर्गत सामाजिक वनीकरण विभाग तसेच वनविभागातर्फे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी मोर्णा नदी काठी करण्यात आले होते.जनतेमध्ये जनजागृती करुन जनतेला वृक्षलागवडीबाबत प्रोत्साहीत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मोर्णा काठी वृक्षारोपण केले. त्यांच्या माध्यमातुन वृक्षलागवडीबाबत नागरीकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अकोला जिल्हयासाठी तब्बल १९ लाख २२ हजार वृक्ष लागवडीच उदिष्ट देण्यात आले आहे. रविवारपासून वृक्ष लागवडीची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शासकीय यंत्रणेसह सामान्य नागरिक, विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत.जिल्ह्यात ४० रोपवाटिकावन विभागातर्फे स्थापन करण्यात आलेल्या विविध रोपे विक्री केंद्रांवरुन नागरिकांनी रोपे घेऊन जाता येतील. अकोला येथे वनकुटी, अशोक वाटीकेसमोर, अकोट येथे वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) कार्यालय व तहसिल कार्यालय येथे रोप विक्री केंद्र आहे. तसेच जिल्हयात वन विभागाकडून १९ व सामाजिक वनीकरण विभागाकडून २१ रोपवाटिका तयार करण्यात आलेल्या आहेत. या रोप वाटिकेत २० लक्ष १० हजार रोपे आहेत, नागरीकांनी मोठया प्रमाणात रोपे घेवुन वृक्षारोपणाचे संकल्पात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.

या वृक्षांचा समोवशखैर, पांगरा, अंजन, निम, काशिद, शिरस, करंज, विलायती चिंच, आवळा, चिंच, सिताफळ, शेवगा, जांभूळ, हादगा, वड, पिंपळ, बांबू, पिशवीतील साग रोपे, गुलमोहर, अमलतास, रेन ट्री, पेल्ट्रोफोरम, कांचन, बोगनवेल, क्रोटॉन, डयुरांटा, मोगरा, वड इत्यादी रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामुळे जिल्हयात वृक्षलागवडी बाबत समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाguardian ministerपालक मंत्रीMorna Riverमोरणा नदी