शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सामाजिक बांधीलकी : कर्मचाऱ्यांना मार्चमध्येच दिला एप्रिलचा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 18:20 IST

राजू फाटे यांचा हा पुढाकार उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.

- सचिन राऊत

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला प्रदीप ऊर्फ राजू फाटे यांनी प्रतिसाद देत अकोल्यातील ओम नम: शिवाय इलेक्ट्रिकल्स आणि अनुष्का इंडस्ट्रीजचे संचालक राजू फाटे यांनी त्यांच्या कर्मचाºयांसह कामगारांना एप्रिल महिन्याचे वेतन आधीच देऊन सामाजिक बांधीलकी जपण्याचा परिचय करून दिला.कोरोना या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासन गंभीर आहे. उपाययोजना म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे; मात्र बंद तसेच कामकाज कमी होत असल्याने बेरोजगारी तसेच काहींचे संसार उघड्यावर येण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक व्यापारी व उद्योजक यांनी त्यांच्या कर्मचाºयांना कामगारांना एक महिन्याचा पगार देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच आवाहनाला प्रदीप ऊर्फ राजू फाटे यांनी प्रतिसाद देत त्यांच्या कर्मचाºयांना एप्रिल महिन्याचे वेतन आधीच दिले. यासोबतच त्यांच्या कामगारांच्या कामाचे तासही कमी करण्यात आली असून, त्यांना आळी-पाळीने काम देऊन कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. राजू फाटे यांचा हा पुढाकार उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.  पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसादपंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजक, व्यापाºयांना त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानावर कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व कामगारांच्या कुटुंबीयांची काळजी म्हणून त्यांना वेतन देण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाला ओम नम: शिवाय इलेक्ट्रिकल्स व अनुष्का इंडस्ट्रीजचे संचालक प्रदीप ऊर्फ राजू फाटे यांनी प्रतिसाद देत त्यांच्या दोन्ही प्रतिष्ठानातील कर्मचाºयांना एक महिन्याचे वेतन आधीच दिले. यामध्ये प्रत्येकाने सहभागी होऊन त्यांच्या कामगारांना उघड्यावर न सोडता एक महिन्याचे वेतन देण्याचे आवाहनही फाटे यांनी केले.

कोरोना या गंभीर आजाराचे संशयित अकोल्यातही असल्याने धोका वाढला आहे. शासन-प्रशासन खबरदारी घेत असून, आपलेही सामाजिक कर्तव्य म्हणून कोरोनाला आळा घालण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ओम नमो शिवाय इलेक्ट्रिकल्स आणि अनुष्का इंडस्ट्रिजमधील कर्मचाºयांना आधीच वेतन देण्यात आले आहे.प्रदीप उर्फ राजू फाटेअध्यक्ष ईसीए, संचालक, अनुष्का इंडस्ट्रीज

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक