‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांची होणार ‘पोलखोल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:58 PM2018-07-22T12:58:13+5:302018-07-22T13:00:20+5:30

अकोला: शासन निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते वर्षभरातच खराब झाले झाल्याने, रस्ते कामांत अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

'Social audit' will work on road work in Akola | ‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांची होणार ‘पोलखोल’!

‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांची होणार ‘पोलखोल’!

Next
ठळक मुद्देगुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या तीन पथकाद्वारे नमुने घेण्याचे काम  सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने ‘सोशल आॅडिट’च्या तपासणीत शहरातील रस्ते कामांची ‘पोलखोल’ होणार आहे.

अकोला: शासन निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेले रस्ते वर्षभरातच खराब झाले झाल्याने, रस्ते कामांत अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँक्रिटीकरण झालेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांचे ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार आहे. त्यामध्ये रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या तीन पथकाद्वारे नमुने घेण्याचे काम  सुरू करण्यात येत आहे. त्यानुषंगाने ‘सोशल आॅडिट’च्या तपासणीत शहरातील रस्ते कामांची ‘पोलखोल’ होणार आहे.
शासनाकडून प्राप्त निधीतून शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्ते कामांची पाहणी केली असता, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून आले. त्यामुळे काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्ते कामात प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या आणि सुरू असलेल्या रस्ते कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी ‘सोशल आॅडिट’ करण्यात येणार असल्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी १६ जुलै रोजी रोजी काढले. त्यानुसार ‘सोशल आॅडिट’मध्ये रस्ते कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार रस्ते कामांतील गुणवत्ता तपासणीचे काम रविवार, २२ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अकोला उपविभागाच्या गुणनियंत्रण विभागाचे अधिकारी आणि अमरावती व अकोल्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या तीन पथकांकडून रस्ते कामांचे नमुने काढण्यात येणार आहेत. महसूल प्रशासनातील अधिकारी व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत नमुने काढण्यात येणार आहे. त्यामुळे या तपासणीत शहरातील रस्ते कामांची पोलखोल होणार आहे.

नमुने काढण्यासाठी गठित केलेली असे आहेत पथके!
१) गुणनियंत्रण, जलसंपदा उपविभाग, अकोला आणि शिपला इंजिनिअरिंग कॉलेज, अमरावती.
२) गुणनियंत्रण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोला आणि श्री शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेज अकोला.
३) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावतीचे प्राध्यापक व विद्यार्थी.

 

Web Title: 'Social audit' will work on road work in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.