आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:11 AM2020-05-08T10:11:24+5:302020-05-08T10:11:38+5:30

पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे.

So far, only 5 per cent farmers have been allotted crop loans | आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप

आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्ज वाटपाच्या नियोजनात शेतकरी कर्जमाफीसाठी माहिती अपलोड झालेले १,०९,६४५ व गतवर्षी कर्ज वाटप केलेल्या ५५,६९१ शेतकरी मिळून चालू वर्षात १ लाख ५० हजार खातेधारकांना चालू वर्षात कर्ज वाटप करण्याची तयारी आहे. त्याचवेळी १ एप्रिलपासून वाटप सुरू करणे अपेक्षित असताना इतक्या दिवसांत आतापर्यंत केवळ ८ हजार म्हणजेच ५ टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पेरणीला केवळ ३० ते ४० दिवसांचा कालावधी उरल्याने उर्वरित शेतकºयांना पेरणीसाठी हातात पैसा येतो की नाही, याबाबत शेतकरी हवालदिल होत आहे.
गत काही वर्षांत पीक कर्ज भरण्यास असमर्थ ठरलेल्या शेतकºयांसाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. त्या योजनेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील २२७ बँकांमध्ये असलेल्या १,८४,०२० शेतकरी खातेदारांपैकी ६९,८५९ शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ४३९ कोटी रक्कम शासनाकडून जमा झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पात्र १,६५,३३६ पैकी केवळ १ लाख ५० हजार शेतकºयांनाच १,२०० कोटी रुपये पीक कर्ज देण्याचे नियोजन प्रशासनाने तयार केले आहे. त्यामध्ये १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना खरीप तर ७,५०० शेतकºयांना रब्बीचे पीक कर्ज वाटप होणार आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप १ एप्रिलपासून सुरू होणे अपेक्षित आहे; मात्र चालू वर्षात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संचारबंदी, लॉकडाउनच्या काळात अनेक सेवा विस्कळीत झाल्या.
त्यामध्ये बँकांच्या कामकाजालाही फटका बसला. ही परिस्थिती असली तरी खरिपाची पेरणी तोंडावर येत आहे. पीक कर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यास आधीच उशीर झाला. त्यातही लॉकडाउनचे नियम पाळत वाटप करावे लागत आहे.
या सर्व अडथळ्यांमुळे कर्ज वाटपाची गती मंदावली. आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी व राष्ट्रीयीकृ त बँका मिळून केवळ ८ हजार शेतकºयांना वाटप झाले आहे. त्यातही सहा हजार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे खातेदार आहेत. राष्ट्रीयीकृ त बँकांनी केवळ दोन हजार शेतकºयांना वाटप केले. ही परिस्थिती पाहता पेरणीला सुरुवात होईपर्यंत किती शेतकºयांच्या हातात कर्जाची रक्कम मिळेल, ही बाब सध्यातरी अनिश्चित आहे. ं


७४ हजार शेतकºयांचा वांधा
कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अद्याप ७४,३५५ शेतकºयांची माहिती अपलोड झालेली नाही. त्यामुळे चालू वर्षात ते शेतकरी कर्ज वाटपासाठी पात्र ठरतात की नाही, याबाबतचा संभ्रमही आता शेतकºयांमध्ये आहे. या शेतकºयांबाबत निर्णय न झाल्यास त्यांना गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कर्जापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.

नियोजनाप्रमाणे शेतकºयांना कर्ज वाटप सुरू आहे. पेरणीच्या काळापूर्वी वाटपाची गती वाढविण्याचे बँकांना सांगितले आहे. त्यानुसार सर्वांना कर्ज वाटप होणार आहे.
- डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.

 

Web Title: So far, only 5 per cent farmers have been allotted crop loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.