विद्यार्थिनीच्या दप्तरात साप !

By Admin | Updated: March 3, 2016 02:15 IST2016-03-03T02:15:02+5:302016-03-03T02:15:02+5:30

वर्गशिक्षकाने प्रसंगसावधानता दाखवली; सापास शाळेपासून दूर सोडले.

The snake at the student room! | विद्यार्थिनीच्या दप्तरात साप !

विद्यार्थिनीच्या दप्तरात साप !

धानोरा महासिद्ध (जि. बुलडाणा): येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसर्‍या वर्गामधील विद्यार्थ्यानीच्या दप्तरातून साप निघाल्याने शाळेमध्ये एकच खळबळ उडाल्याचा प्रकार बुधवारी घडला. शाळेतील प्रार्थना आटोपल्यावर गायत्री संतोष मेंढार या विद्यार्थ्यानीने वर्गात अभ्यासाची पुस्तके काढण्यासाठी दप्तर उघडताच, अचानक दप्तरातून लहान साप निघाला. यामुळे वर्गात एकच धांदल उडाली. वर्गशिक्षकाने प्रसंगसावधानता राखून ते दप्तर तत्परतेने वर्गाबाहेर नेवून दप्तरातील सापास दूर सोडले. साप निघून गेल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

Web Title: The snake at the student room!