सर्पदंशाने महिला दगावली!

By Admin | Updated: June 29, 2016 00:48 IST2016-06-29T00:48:20+5:302016-06-29T00:48:20+5:30

शेगावातील घटना; आकस्मिक घटनेची नोंद.

Snake bite woman! | सर्पदंशाने महिला दगावली!

सर्पदंशाने महिला दगावली!

शेगांव (जि. बुलडाणा): सर्पदंश झाल्याने ३७ वर्षीय महीला दगावल्याची घटना येथील सुदामा नगरात घडली.
सुदामा नगरातील रुख्मा विनोद बगे या महिलेस सापाने दंश केल्याने त्यांची प्रकृती बिघडली. सदर प्रकार लक्षात येताच नातेवाईकांनी रुख्मा बगे यांना तात्काळ अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रुख्मा बगे यांची प्राणज्योत मावळली. याप्रकरणी शहर पोलीसांनी डॉ. मानसिंग मेंडसे यांच्यातर्फे कक्षसेवक शफीक हुसैन यांच्या तक्रारीवरुन कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Snake bite woman!