लघुसिंचनचा शाखा अभियंता पुन्हा निलंबित
By Admin | Updated: May 16, 2015 00:48 IST2015-05-16T00:48:59+5:302015-05-16T00:48:59+5:30
‘जलयुक्त शिवार’ कामांची अंदाजपत्रके सादर न करणे भोवले.

लघुसिंचनचा शाखा अभियंता पुन्हा निलंबित
अकोला: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची अंदाजपत्रके सादर केली नसल्याने, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या पातूर उपविभागाचे शाखा अभियंता एस.जे.राऊत यांना पुन्हा निलंबित करण्यात आले आहे. या संबंधीचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एम. देवेंदर सिंह यांनी शुक्रवारी दिला. शासनामार्फत राबविण्यात येणार्या जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कामांची अंदाज पत्रके सादर करण्यात अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे लघुसिंचन विभागाचे शाखा अभियंता राऊत यांना २0 मार्च रोजी निलंबित करण्यात आले होते. यासंदर्भात राऊत यांनी माफीनामा लिहून दिल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्याच्या आदेशानुसार त्यांना ३१ मार्च रोजी पुनस्र्थापित करण्यात आले होते. परंतु, त्यानं तरही जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची अंदाजपत्रके सादर केली नसल्याने आणि यासंदर्भात वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले नसल्याने लघुसिंचन विभागांतर्गत पातूर येथील शाखा अभियंता एस.जे.राऊत यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी १५ मे रोजी दिला. पुन्हा निलंबनाची कारवाई झाल्याने, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची अंदाजपत्रके सादर न करणे राऊत यांना चांगलेच भोवले.