नारा स्वबळाचा, पण ८0 जागांवरही बळ पुरेना
By Admin | Updated: February 11, 2017 02:18 IST2017-02-11T02:18:10+5:302017-02-11T02:18:10+5:30
अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपासह शिवसेना व भारिप-बमसं या पक्षांनी स्वबळाची दिली हाक.

नारा स्वबळाचा, पण ८0 जागांवरही बळ पुरेना
अकोला, दि. १0- महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपासह शिवसेना व भारिप-बमसं या पक्षांनी स्वबळाची हाक देत निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकले आहेत. जागा वाटपाच्या मुद्यांवर आघाडी व युती फिस्कटल्यामुळे या पक्षांकडे सर्वच प्रभागात उमेदवार असतील, असा समज होणे साहजिकच आहे. प्रत्यक्षात मात्र या सर्वच पक्षांना ८0 जागांसाठी उमेदवारही मिळाले नाहीत.
महापलिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीनुसार भाजपाचे ७२, शिवसेनेचे ७१, काँग्रेसचे ६८ राष्ट्रवादी काँग्रेसचे ७३, भारिप-बमसचे ५७, मनसेचे १८ एमआयएमचे १४ व समाजावादी पार्टीचे केवळ १३ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवरांसोबतच २0 प्रभागातील ८0 जागांसाठी १७0 अपक्षांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे काही उमेदवारांना शिवसेना तसेच भारिप बमसंने पुरस्कृत केले आहे.