सोने लंपास करणारा कारागृहात
By Admin | Updated: May 14, 2017 04:20 IST2017-05-14T04:20:53+5:302017-05-14T04:20:53+5:30
शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.

सोने लंपास करणारा कारागृहात
अकोला : सराफा दुकानात डायकटिंगसाठी आणलेले सोन्याचे दागिने हिसकावून पळणार्या चोरट्यास कोतवाली पोलिसांनी शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला. गांधी रोडवरील दिलीप मशीन चेनवाडा यांच्या सराफा दुकानातून गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास २.२५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून पळणारा आरोपी श्याम रामअवतार यास सिव्हिल लाइन पोलिसांनी पाठलाग करून पकडले आणि कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केले. श्याम रामअवतारला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.