रुद्रायणी मंदिर परिसरात सहा जोडप्यांचे अश्लील चाळे

By Admin | Updated: September 17, 2014 02:40 IST2014-09-17T02:40:12+5:302014-09-17T02:40:12+5:30

बाश्रीटाकळी पोलिसांची युवक-युवतींवर कारवाई

Six pairs of pornographic activities in the Rudraani Temple area | रुद्रायणी मंदिर परिसरात सहा जोडप्यांचे अश्लील चाळे

रुद्रायणी मंदिर परिसरात सहा जोडप्यांचे अश्लील चाळे

बाश्रीटाकळी: तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील रुद्रायणी देवी मंदिराच्या परिसरात अश्लील चाळे करणार्‍या अकोल्यातील सहा युवक व सहा युवतींना बाश्रीटाकळी पोलिसांनी सोमवार, १५स प्टेंबर रोजी रंगेहात पकडले.
बाश्रीटाकळी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक धनकारवार, मंगरुळकर हे पोलिस कर्मचारी सोमवारी दारू अड्डय़ावर छापा टाकण्यासाठी चिंचोली-रुद्रायणी परिसरातून जात असताना मंदिर परिसरात काही युवक-युवती धिंगाणा घालत असल्याची माहिती काही भाविकांनी त्यांना दिली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ६ युवक व ६ युवती अश्लील चाळे करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या जोडप्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. यामध्ये पार्डी येथील एक, अकोल्यातील चार तर शिवणी-शिवर येथील एक असे एकूण सहा युवक व अकोल्यातील सहा युवतींचा समावेश आहे. पोलिसांनी युवतींच्या नातेवाइकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले. तर युवकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिले. दरम्यान, रुद्रायणी टेकडीवरील मंदिर परिसरात असे प्रकार नेहमीच घडत असल्याने मंदिराचे पावित्र्य धोक्यात आल्याच्या प्रतिक्रिया भाविकांकडून व्यक्त होत आहेत.

Web Title: Six pairs of pornographic activities in the Rudraani Temple area