‘जीएमसी’मध्ये ‘पीजी’च्या आणखी सहा जागा
By Admin | Updated: April 2, 2017 02:56 IST2017-04-02T02:56:01+5:302017-04-02T02:56:01+5:30
‘ओबीजीवाय’च्या पाच, तर ‘स्किन’ची एक.

‘जीएमसी’मध्ये ‘पीजी’च्या आणखी सहा जागा
अतुल जयस्वाल
अकोला, दि. १- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) आणखी सहा जागा वाढल्या आहेत. स्त्रीरोग प्रसूतीशास्त्राच्या पाच आणि चर्मरोगशास्त्राची एक अशा एकूण सहा नव्या जागांना भारतीय वैद्यकीय परिषद (एमसीआय)ची मान्यता मिळाल्याने आता येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण जागा २६ वर गेल्या आहेत.
वर्ष २0१४-१५ या शैक्षणिक वर्षांंंपासून येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमांना पहिल्यांदा मान्यता मिळाली. त्यावेळी औषधनिर्माणशास्त्र (फॉर्मेकोलॉजी-एमडी) आणि सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबॉयलॉजी-एमडी) या दोन अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २0१५-१६ या शैक्षणिक वर्षांंंत न्यायवैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक मेडिसिन -एमडी), जीवरसायनशास्त्र (बायोकेमेस्ट्री-एमडी), स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र (ओबीजीवाय- एमएस), विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी-एमडी), शरीरक्रियाशास्त्र (फिजिओलॉजी-एमडी) या पाच नव्या अभ्यासक्रमांना एमसीआयकडून मान्यता मिळाली. येत्या २0१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचनाशास्त्र (अँनॉटॉमी), जनऔषधशास्त्र (पीएसएम) आणि चर्मरोगशास्त्र (स्किन) हे तीन नवे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
अकोला "जीएमसी" चौथे
आतापर्यंंंत केवळ मुंबई, पुणे व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्येच चर्मरोगशास्त्र हा अभ्यासक्रम होता. आता अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही चर्मरोगशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे.
अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्यासाठीे ह्यएमसीआयह्णकडे प्रस्ताव सादर केला होता. एमसीआयने आगामी सत्रापासून जागा वाढविण्यास मान्यता दिली.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.