सहा मोबाईल टॉवर्स सील; सेवा विस्कळीत
By Admin | Updated: September 11, 2014 22:53 IST2014-09-11T22:53:01+5:302014-09-11T22:53:01+5:30
अकोल्यातील ११५ मोबाईल टॉवर्सपैकी २५ टॉवर्स बेकायदेशीर.

सहा मोबाईल टॉवर्स सील; सेवा विस्कळीत
अकोला: व्यावसायिक संकुल तथा रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर उभारताना नवीन निकष पायदळी तुडविणार्या विविध मोबाईल फोन कंपन्यांचे सहा टॉवर्स सील करण्याची कारवाई ११ सप्टेंबर रोजी महापालिकेने केली. या कारवाईमुळे शहरातील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली. दुपारी ३ वाज तानंतर बहुतांश कंपन्यांची मोबाईल सेवा विस्कळीत झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
मोबाईल टॉवर्स उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने नवीन नियमावली लागू केली. त्याविषयीचे आदेश महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले. त्यानुसार शहराच्या विविध भागात उभारण्यात आलेल्या ११५ मोबाईल टॉवर्सपैकी फक्त ७0 टॉवर्स उभारण्यास महापालिकेने मंजुरी दिली होती. उर्वरित २५ टॉवर्स बेकायदेशीर असून, विविध त्रुट्या असल्याने १८ टॉवर्सचे प्रकरण प्रलंबित आहे.
संबंधित कंपन्यांनी नवीन नियमावलीकडे मनपाने नोटीस दिल्यानंतरही दुर्लक्ष केल्याने मनपा अधिकार्यांनी शहराच्या दक्षिण झोनमधील विविध कंपन्यांचे सहा मोबाईल टॉवर्स सील केले. टॉवर्स सील केल्यामुळे शहरातील भ्रमणध्वनी सेवा खंडित झाली आहे.