पश्चिम विदर्भाला लागणार सहा लाख मेट्रिक टन खतांचा साठा
By Admin | Updated: May 5, 2015 00:05 IST2015-05-05T00:05:08+5:302015-05-05T00:05:08+5:30
कृषी विभागाने केले नियोजन; डीएपीचा तुटवडा जाणवण्याची शक्यता.

पश्चिम विदर्भाला लागणार सहा लाख मेट्रिक टन खतांचा साठा
अकोला : येत्या खरीप हंगामात पश्चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टर क्षेत्रासाठी ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन रासायनिक खतांचा साठा लागणार असून, कृषी विभागाने यासाठीचे नियोजन केले आहे. पण, दरवर्षी कमतरता भासणार्या डीएपी खताचा साठा यावर्षी ९७,८00 एवढाच असल्याने या खताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात सर्वाधिक १४ लाख ९२ हजार ९0१ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाणार आहे. त्यानंतर कापसाचे पीक हे ९ लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाणार आहे. उर्वरित इतर तृण, गळीत व डाळवर्गीय पिकांचा समावेश आहे. या सर्व पिकांसाठी यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन रासायनिक खत लागणार आहे. या करिता कृषी विभागाने मागणी नोंदवली आहे. यामध्ये युरिया २ लाख १८ हजार ९00 मेट्रिक टन, एमओपी ३४ हजार ५00 मेट्रिक टन, एसएसपी १ लाख ११ हजार १00 मेट्रिक टन, एएस ५,४00 मेट्रिक टन, १0:२६:२६ हे खत ५,१00 मेट्रिक टन, १२:३२:१६ या खताची ४,४00 मेट्रिक टन, १४:३५:१४ हे खत १५,८00 मेट्रिक टन लागणार आहे. १४:२८:१४ या खताच्या ७,३00 मेट्रिक टन साठय़ाची गरज आहे. १५:१५:१५ हे खत ११,९00 मेट्रिकटन लागणार आहे, तर १६:१६:१६ या खताचा साठा १0,७00 मेट्रिक टन लागणार आहे. १६:२0:0 :१३ हे खत २ हजार १00 मेट्रिक टन लागणार आहे. १९:१९:१९ हे खत १,४00 मेट्रिक टन लागणार आहे. २0:२0:00 या खताची ५९,२00 मेट्रिक टनाची नोंदणी करण्यात आली आहे. २४:२४:00 हे खत ५,६00 मेट्रिक टन लागणार आहे. अकोला जिल्हय़ासाठी डीएपी १२,९00 मेट्रिक टन, तर युरिया १९,८00 मेट्रिक टन लागणार आहे. इतर सर्व खते मिळून या जिल्हय़ासाठी ७२,४00 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. बुलडाणा जिल्हय़ाला युरिया ६२,८00 तर डीएपी २७,१00 मेट्रिक टनासह इतर सर्व खते मिळून १,८३ ७00 मेट्रिक टन लागणार आहे. वाशिम जिल्हय़ासाठी युरिया १८,२00, डीएपी ११,६00 मे.ट. तर उर्वरित खते मिळून ६0,६00 मेट्रिक टन रासायनिक खते लागणार आहेत. अमरावती जिल्हय़ाला सर्व खते १,१५,६00 मेट्रिक टन, तर यवतमाळ जिल्हय़ासाठी २,३,९00 मेट्रिक खताचा साठा लागणार आहे. या सर्व खतांची नोंदणी कृषी विभागाने केली आहे. दरम्यान यंदाच्या खरीप हंगामासाठी खताची मागणी केली असून, हे खत शेतकर्यांना उपलब्ध होईल. त्यामुळे खतांची टंचाई भासणार नसल्याचे अमरावती येथील विभागीय कृषी सह संचालक एस.आर.सरदार यांनी सांगीतले.