शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सहा कारागृह लॉकडाउन - गृहमंत्री देशमुख यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 17:52 IST

पोलीस चौकशीदरम्यान सुमारे १०० जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहितीही ना. देशमुख यांनी येथे दिली.

अकोला : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यातील सहा कारागृह खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी सोमवारी अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पालघर येथे घडलेली घटना दुर्दैवी असून, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी शासनाने सुरू केली आहे. शिवाय पोलीस चौकशीदरम्यान सुमारे १०० जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहितीही ना. देशमुख यांनी येथे दिली.यावेळी केंद्रीय मानव संसाधन विकास माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स दूरसंचार राज्यमंत्री ना. संजय धोत्रे, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर उपस्थित होते. ना. देशमुख यांनी माहिती दिली की, राज्यात सहा ठिकाणच्या तुरुंगात क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने हे तुरुंग लॉकडाउन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार या तुरुंगात बाहेरची कोणीही व्यक्ती आत जाणार नाही व आतली व्यक्ती बाहेर जाणार नाही, असे ना. देशमुख यांनी स्पष्ट केले. संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून ५७ हजार ५१७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, क्वारंटीन केले असतानाही बाहेर फिरताना आढळले म्हणून ५७२ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर लक्षसोशल मीडियातून प्रसारित संदेशाद्वारे सामाजिक वातावरण खराब केल्याप्रकरणी २४२ गुन्हे दाखल झाले आहेत. फेक न्यूजबद्दल राज्य शासनाने कडक धोरण अवलंबिले असल्याचे सांगून सोशल मीडियावर लक्ष असल्याची माहिती ना. देशमुख यांनी दिली. वृत्तपत्र वितरणाबाबत समीक्षेनंतर निर्णयवृत्तपत्र वितरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केवळ घरोघर वाटप करण्यावर बंदी आहे. तथापि, स्टॉल्सवर विक्री करण्यास बंदी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत लवकरच या मार्गदर्शक सूचनेची वरिष्ठ पातळीवर समीक्षा करून निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखAkolaअकोलाjailतुरुंग