सहा घरांना आग; साहित्य खाक
By Admin | Updated: May 6, 2015 01:00 IST2015-05-06T01:00:02+5:302015-05-06T01:00:02+5:30
मूर्तिजापूूर तालुक्यातील शेतकरी कुटुंबांची लाखो रुपयांची हानी.

सहा घरांना आग; साहित्य खाक
मूर्तिजापूूर : तालुक्यातील गुंजवाडा येथे शेतकर्यांच्या सहा घरांना मंगळवारी आग लागली. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले. आधीच नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. आता आगीत घरातील साहित्य खाक झाले. आगीत धान्य व कुटारही खाक झाले. त्यामुळे शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.
गुंजवाडा येथील पात्रे कुटुंबातील पुरुष सदस्य हिरपूर येथे लग्नाला गेले होते. मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. आगीत मोहन पात्रे, श्याम पात्रे, राम पात्रे, साहेबराव पात्रे, हिंमतराव पात्रे, सुधाकरराव पात्रे यांच्या घरातील साहित्य खाक झाले. घराच्या बाजूला कुटार ठेवण्यात आले होते. आगीत तीन गंजी चारा, १५ ट्रॉली कुटार खाक झाले. थ्रेशर मशीनचे टायर, वायर आणि इतर साहित्यही जळाले. आगीची माहिती मिळताच मूर्तिजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत पाच लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.