बारावीच्या परीक्षेत सहा परीक्षार्थी निलंबित

By Admin | Updated: February 27, 2015 01:38 IST2015-02-27T01:38:13+5:302015-02-27T01:38:13+5:30

भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत सहा परीक्षार्थी निलंबित.

Six examinees suspended in HSC examinations | बारावीच्या परीक्षेत सहा परीक्षार्थी निलंबित

बारावीच्या परीक्षेत सहा परीक्षार्थी निलंबित

महान ( जि. अकोला): : स्थानिक मनोहर नाईक कनिष्ठ महाविद्यालयात सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत २६ फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत सहा विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडून निलंबित केले. विशेष बाब म्हणजे हे सहाही विद्यार्थी १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसले होते. अभ्यास न करता कॉपी करून उत्तीर्ण होण्याचे त्यांचे स्वप्न भरारी पथकाने टाकलेल्या धाडीने भंगले. परीक्षेत कॉपी करणे त्यांच्या अंगलट आले.

Web Title: Six examinees suspended in HSC examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.