‘त्या’नराधम शिक्षकाला सहा दिवसांची पाेलिस काेठडी; जिल्हा व सत्र न्यायालयात केले हजर

By आशीष गावंडे | Updated: August 21, 2024 22:27 IST2024-08-21T22:27:44+5:302024-08-21T22:27:59+5:30

यादरम्यान, काेणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी न्यायालय परिसरात पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. 

Six days police custody to that murderous teacher Appeared in District and Sessions Court | ‘त्या’नराधम शिक्षकाला सहा दिवसांची पाेलिस काेठडी; जिल्हा व सत्र न्यायालयात केले हजर

‘त्या’नराधम शिक्षकाला सहा दिवसांची पाेलिस काेठडी; जिल्हा व सत्र न्यायालयात केले हजर

आशिष गावंडे/अकोला

अकोला: बाळापूर तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद शाळेत इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सहा विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करणारा नराधम शिक्षक प्रमोद मनोहर सरदार याला उरळ व अकाेला पाेलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले असता, न्यायाधिश ए.डी.क्षिरसागर यांनी २६ ऑगस्ट पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली. यादरम्यान, काेणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी न्यायालय परिसरात पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. 

उरळ नजीकच्या एका गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रमोद मनोहर सरदार हा शिक्षक गणित व विज्ञान शिकवतो. शिकवणी वर्गाच्या नावाखाली हा शिक्षक मुलींसाेबत वाइट उद्देशातून संवाद साधून शारिरिक लगट करीत हाेता. माेबाइलमधील अश्लिल व्हीडीओ दाखवून मुलींना लज्जा निर्माण हाेइल,अशा प्रकारे बाेलत असे. शिक्षकाचे अश्लिल संभाषण न पटल्यामुळे सहा विद्यार्थीनींनी शिकवणी वर्गाला जाणे बंद केले. त्यानंतर जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकाने याच सहा मुलींचा लैंगिक छळ सुरू केला. हा प्रकार असह्य हाेत असल्यामुळे या सहा विद्यार्थिनींनी ही बाब शाळेतीलच एका महिला शिक्षिकेला सांगितली. महिला शिक्षिकेने घडलेला सर्व प्रकार चाइल्ड हेल्पलाइनवर सांगितल्यानंतर या अश्लाघ्य प्रकाराला वाचा फुटली.

शिक्षकाविरुध्द तातडीने कारवाइ

धाडस दाखवत सहा विद्यार्थीनींनी एकत्र येत उरळ पाेलिसांकडे तक्रार नाेंदवली. तक्रारीचे गांभीर्य पाहता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शिक्षकाला तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. उरळ पाेलिसांनी आरोपी शिक्षकाविरुध्द पोक्सो कायद्याच्या कलम ८,१० व १२ नुसार तसेच बीएनएस कलम ७४ व ७५ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Six days police custody to that murderous teacher Appeared in District and Sessions Court