मूर्तिजापूरसाठी सहा कोटींचा प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:13 IST2017-09-07T01:12:53+5:302017-09-07T01:13:08+5:30
अकोला : जिल्हय़ातील मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूर शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या सहा कोटींच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविण्यात आला.

मूर्तिजापूरसाठी सहा कोटींचा प्रस्ताव!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूर शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या सहा कोटींच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविण्यात आला.
मूर्तिजापूर शहरात वारंवार निर्माण होणारी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, मूर्तिजापूर शहराला घुंगशी बॅरेजमधून पाणीपुरवठा करण्याकरिता घुंगशी बॅरेजपासून मूर्तिजापूरपर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या योजनेचा प्रस्ताव मूर्तिजापूर नगरपालिकेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. सहा कोटी रुपयांच्या योजनेचा हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.