पातूर तालुक्यात जिल्हा परिषदसाठी सहा, पंचायत समितीसाठी २० अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:01+5:302021-07-07T04:24:01+5:30
शिर्ला जिल्हा परिषद गटासाठी सहा जणांनी, शिर्ला पंचायत समिती गणासाठी सात, खानापूर गणासाठी पाच, आलेगाव गणासाठी ८ जणांनी उमेदवारी ...

पातूर तालुक्यात जिल्हा परिषदसाठी सहा, पंचायत समितीसाठी २० अर्ज दाखल
शिर्ला जिल्हा परिषद गटासाठी सहा जणांनी, शिर्ला पंचायत समिती गणासाठी सात, खानापूर गणासाठी पाच, आलेगाव गणासाठी ८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषद गटासाठी काँग्रेस, रिपाइं आठवले गट, प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. जिल्हा परिषद गटात एकही अपक्ष उमेदवार नाही. त्यामुळे सर्व सहा उमेदवार कायम राहतील अशी स्थिती आहे
शिर्ला पंचायत समिती गणासाठी चार राजकीय पक्ष आणि तीन अपक्ष अशा एकूण सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खानापूर पंचायत समिती गणासाठी शिवसेना, भाजपा, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. आलेगाव पंचायत समिती गणासाठी पाच राजकीय पक्ष, तीन अपक्ष अशा एकूण आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तीन अर्ज झाले बाद
मंगळवारी अर्ज छाननीच्या वेळेस तीन उमेदवारांनी शपथपत्र दाखल न केल्याने तीन अर्ज अवैध ठरले. जिल्हा परिषद गट आणि शिर्ला पंचायत समिती गणामध्ये पातूर नगरपरिषद क्षेत्रातील बहुतांश भाग समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नगर परिषद क्षेत्रातीलही दिग्गज कामाला लागल्याचे चित्र आहे.
उमेदवारी मागे घेण्याकडे लक्ष
१४ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने मतदार संघामध्ये किती उमेदवार कायम राहतात. कोणते राजकीय पक्ष आणि अपक्ष माघार घेतात. हे चित्र स्पष्ट होईल. बहुतांश उमेदवार राजकीय पक्षांनी दिलेले असल्यामुळे उमेदवार कायम समजण्यात येत आहेत. मात्र, अपक्ष उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात हे १४ जुलैला स्पष्ट होईल.
060721\img-20210706-wa0135.jpg
स्फुटिरिणीसाठी सभा