शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ‘एसआयटी’ दाखल; झाडाझडती सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:33 IST

अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकरी प्रकरणात शासनामार्फत गठित करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) शुक्रवारी अकोल्यात धडक देत झाडाझडती सुरू केली.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणीतून विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकरी प्रकरणात शासनामार्फत गठित करण्यात आलेल्या विशेष तपासणी पथकाने (एसआयटी) शुक्रवारी अकोल्यात धडक देत झाडाझडती सुरू केली. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने जिल्हय़ात शेतकर्‍यांचा झालेला मृत्यू आणि विषबाधा झालेल्या शेतकर्‍यांची ‘एसआयटी’ने तपासणी सुरू केली आहे.कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने मृत्यू झालेल्या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी शासनामार्फत विशेष तपासणी पथक (एसआयटी) गठित करण्यात आली. ‘एसआयटी’च्या कार्यक्षेत्रात अकोला जिल्हय़ाचा समावेश झाल्यानंतर अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपासणी पथक ३ नोव्हेंबर रोजी अकोल्यात दाखल झाले. कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने जिल्हय़ात सात शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. त्यानुषंगाने ‘एसआयटी’ने कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने मृत्यू झालेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांसह विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतकर्‍यांची तपासणी सुरू केली आहे. अमरावती विभागीय आयुक्त तथा विशेष तपासणी पथक प्रमुख पीयूष सिंह यांच्यासह विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन नाईकवाडे, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदिरवाडे, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक विजय वाघमारे, के .डब्ल्यू. देशकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांची माहिती घेत विषबाधा झाल्याने उपचार घेत असलेल्या शेतकर्‍यांची चौकशी केली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तहसीलदार राजेश्‍वर हांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

‘सवरेपचार’मध्ये भेट; विषबाधित चार शेतकर्‍यांची विचारपूस‘एसआयटी’ने अकोल्यातील सवरेपचार रुग्णालयाला भेट देऊन कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने सवरेपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार शेतकर्‍यांची विचारपूस केली. त्यामध्ये अकोला जिल्हय़ातील तुकाराम कानडे (व्याळा), रवी लोखंडे (टिटवा), गोविंदा डिगांबर आमले (माळेगाव बाजार) आणि वाशिम जिल्हय़ातील अक्षय गणेश राठोड (खंडाळा) इत्यादी चार शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची ‘एसआयटी‘ने विचारपूस केली.

आगर येथे मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वनकीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधेने आगर येथील शेतकरी राजेश मनोहर फुकट यांचा मृत्यू झाला आहे. त्यानुषंगाने ‘एसआयटी’ने आगर येथे जाऊन मृतक कुटुंबीयांचे सांत्वन केले, तसेच विचारपूस करून माहिती घेतली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती