शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी बहीण-भाऊ निघाले दौऱ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 13:46 IST

रक्तदानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. या उदात्त हेतूने पुण्यातील बहीण-भाऊ राज्याच्या दौºयावर निघाले आणि प्रत्येक जिल्ह्यात रक्तमित्र, रक्तपेढ्यांच्या मदतीने त्यांनी जनजागृती मेळावे घेतले.

अकोला: रक्तदान हे जीवनदान आहे; परंतु अद्यापही समाजामध्ये रक्तदान करण्याविषयी अनास्था आहे. आपल्या रक्तदानाने एखाद्याचे प्राण वाचू शकतात, ही भावनाच जनमानसात रुजली नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्ताची मोठी कमतरता जाणवते. उन्हाळ्यामध्येसुद्धा रक्तदानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. या उदात्त हेतूने पुण्यातील बहीण-भाऊ राज्याच्या दौºयावर निघाले आणि प्रत्येक जिल्ह्यात रक्तमित्र, रक्तपेढ्यांच्या मदतीने त्यांनी जनजागृती मेळावे घेतले.पुण्यातील महेश बांगड व स्नेहल बांगड ही भावंडे शनिवारी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून अकोल्यात आले होते. अकोला ब्लड बँक व रक्तदात्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रुग्णांना रक्ताची गरज असते; परंतु उन्हाळ्यामध्ये रक्तदानाचे प्रमाण कमी होते. उन्हाळ्यात रक्तदान केल्यामुळे कोणताही त्रास होत नाही. नागरिकांनी त्याबाबतचे गैरसमज दूर सारले पाहिजे, असे आवाहनही बांगड भावंडांनी केले.पुणे येथील महेश बांगड व स्नेहल बांगड हे भावंड रक्ताचे नाते ट्रस्ट (पुणे) या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून उन्हाळ्यात रक्तदान चळवळीला गती देण्यासाठी रक्ताच्या टंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्रभर जनजागृती दौरा करीत आहेत. रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड गत २५ वर्षांपासून रक्तदान जनजागृतीचे काम करीत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत, महेश व स्नेहल रक्तदानाची चळवळ गतिमान करण्यासाठी योगदान देत आहेत. अकोला ब्लड बँकेत झालेल्या कार्यक्रमात डॉ. के. के. अग्रवाल यांनी बांगड भावंडांचे स्वागत केले. यावेळी बांगड भावंडांनी रक्तमित्रांसोबत संवाद साधला आणि रक्तदान चळवळीविषयी चर्चा केली. यावेळी कार्यक्रमाला रक्तमित्र व स्वयंसेवक निशीकांत बडगे, विपुल माने, मोहन लुले, निखिल पाटील, गोपाळ सुलताने, दर्पण कणकरिया, निखिल खानझोडे, आशिष सावळे, आशिष कसले, प्रणव जोशी, पवन डंबलकर, अंकित तायडे, दिलीप गावंडे, डॉ. रेखा अग्रवाल, वैभव वायचाळ, संतोष सांगेवर, सिद्धिविनायक स्वामी, लक्ष्मण चोरे, सुरेंद्र रोहणकार व ब्रम्हा वारोठे उपस्थित होते. (प्रतिनिधी)बांगड भावंडे चालवितात, ब्लडलाइन महाराष्ट्र मोहीमरक्ताचे नाते ट्रस्टमार्फत रक्तदाते, रक्तमित्र, स्वयंसेवकांना ब्लडलाइन महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे जोडण्याचे काम बांगड भावंडे करीत आहेत. त्यासाठीच त्यांनी दौरा सुरू केला असून, ठिकठिकाणच्या खासगी, शासकीय रक्तपेढ्यांसोबत रक्तदाते, रक्तमित्र व स्वयंसेवकांच्या भेटी घेत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाBlood Bankरक्तपेढीSocialसामाजिक