अकोट तालुक्यातील चिचपानी धरणात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 20:42 IST2022-06-12T20:19:57+5:302022-06-12T20:42:30+5:30
Sister and brother drowned in Chichpani dam in Akot taluka : प्रतीक्षा केशव बेलसरे (वय ११ वर्ष) व युवराज केशव बेलसरे (वय ९ वर्ष) हे बहीण-भाऊ दुपारी चीचपानी धरणावर गेले होते.

अकोट तालुक्यातील चिचपानी धरणात बुडून चिमुकल्या बहीण-भावाचा मृत्यू
अकोटःअकोट तालुक्यातील चिचपानी धरणामध्ये दोन सख्या चिमुकल्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना १२ जुन रोजी घडली.
आदीवासी बहुल भागातील डांगरखेड येथील प्रतीक्षा केशव बेलसरे (वय ११ वर्ष) व युवराज केशव बेलसरे (वय ९ वर्ष) हे बहीणभाऊ दुपारी चीचपानी धरणावर गेले होते. आईवडील शेतमजूरीला गेले असता बहीण कपडे धुण्यासाठी धरणावर गेली. सोबत भाऊ सुध्दा गेला. यावेळी भावाचा अचानक पाय घसरल्याने धरणाच्या पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी बहीण गेली असता धरणातील पाण्यात दोंघाचा बुडून मृत्यू प्राथमिक माहिती आहे. दोंघेही बुडाल्याची माहीती मिळताच गावकऱ्यांनी धरणावर धाव घेतली. पाण्यात शोधाशोध केली. दोंघाचे मृतदेह अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, समाजसेवक संदीप बोबडे सर यांनी रुग्णालयात धाव घेत सांत्वना करीत वैद्यकीय प्रकीया लवकर पार पाडण्यासाठी सहकार्य केले. वैद्यकीय अधिकारी यांनी डॉ. नेमाडे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे सर्वळ हळहळ व्यक्त होत आहे.