शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सिरस्कारांनी ‘घड्याळ’ काढले, हाती कमळ घेतले! भाजपमध्ये प्रवेश निश्चित, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

By राजेश शेगोकार | Updated: August 11, 2022 22:32 IST

BJP News: आमदार बळिराम सिरस्कार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे घड्याळ हाती बांधले हाेते, अवघ्या दाेन वर्षांत त्यांनी ‘घड्याळ’ साेडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेण्याचे निश्चित केले आहे.

- राजेश शेगाेकारअकाेला - भारिप बमसंमधून राजकीय कारकिर्द सुरू करत दाेन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार बळिराम सिरस्कार यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे घड्याळ हाती बांधले हाेते, अवघ्या दाेन वर्षांत त्यांनी ‘घड्याळ’ साेडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेण्याचे निश्चित केले आहे. गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरवला असून, येत्या २० ऑगस्ट राेजी ते रीतसर प्रवेश घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बाळापूर विधानसभा मतदारसंघ या कर्मभूमीतून बळिराम सिरस्कार यांनी जिल्हा परिषद सदस्य, जि.प. अध्यक्ष व दाेन वेळा आमदार अशी राजकारणाची चढती पायरी गाठली. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने बुलडाणा लाेकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली. मात्र त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा बाळापूरची उमेदवारी मिळेल, असे मानले जात असताना त्यांना उमेदवारी नाकारून भारिपने राजकीय धक्का दिला हाेता.

या धक्क्यातून सावरत त्यांनी भारिप बमसंला साेडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. गेल्या दाेन वर्षांपासून ते राष्ट्रवादी कार्यरत हाेते. मात्र राज्यातील सत्ता समीकरणे बदलताच त्यांनी आता भाजपाचा मार्ग धरला आहे. गेल्या दाेन महिन्यांपासून त्यांची याबाबत जिल्हास्तरावर चर्चा सुरू हाेती. माजी नगरसेवक जयंत मसने, राजेश भेले, हिरासिंग राठाेड, सचिन काेकाटे, आदींच्या माध्यमातून भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. येत्या २० ऑगस्ट राेजी त्यांचा रीतसर प्रवेश हाेणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाेबत गुरुवारी चर्चा झाली. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणधीर सावरकर, कमल सुरेका, सचिन काेकाटे, आदी उपस्थित हाेते. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावे याकरिता सातत्याने मी प्रयत्न करत आलाे आहे. माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मी हा निर्णय घेतला आहे, असे सिरस्कार यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

सिरस्कार यांच्या प्रवेशापूर्वी बाळापूर मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमच्या सर्व आमदारांनी त्यांच्या प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. गुरुवारी उपमुख्यमंत्र्यांसाेबत भेट व चर्चा झाली. बाळापूर मतदारसंघात भाजपची ताकद आणखी वाढेल हा विश्वास आहे- आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष, भाजप

टॅग्स :BJPभाजपाAkolaअकोला