सिरसो सर्कल पोटनिवडणूक १0 जानेवारीला
By Admin | Updated: December 16, 2015 02:09 IST2015-12-16T02:09:35+5:302015-12-16T02:09:35+5:30
अकोला जिल्हा परिषदेच्या सिरसो सर्कलच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; आचारसंहिता लागू.

सिरसो सर्कल पोटनिवडणूक १0 जानेवारीला
अकोला: जिल्हा परिषदेच्या सिरसो सर्कलच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. या पोटनिवडणुकीसाठी १0 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सिरसो गटाचे (सर्कल) सदस्य गजानन हरिनारायण गावंडे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सिरसो सर्कलच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत १५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १0 जानेवारी रोजी मतदान होणार असून, सर्कल क्षेत्रात मंगळवारपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २१ डिसेंबर रोजी या निवडणुकीची जिल्हाधिकार्यांमार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून, सार्वजनिक सुटी वगळता २१ ते २८ डिसेंबर दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २९ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, ४ जानेवारी रोजी निवडणूक लढविणार्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. मतमोजणी ११ जानेवारी रोजी होईल.