अवघी शैक्षणिकनगरी एकाच छताखाली
By Admin | Updated: May 31, 2014 01:20 IST2014-05-31T01:20:13+5:302014-05-31T01:20:55+5:30
लोकमत आणि मानव स्कूल ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमानेअस्पायर एज्युकेशन फेअरचे उद्घाटन

अवघी शैक्षणिकनगरी एकाच छताखाली
अकोला : लोकमत आणि मानव स्कूल ऑफ पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लॉन्स बस स्टॅन्डजवळ, सिव्हिल लाईन रोड, अकोला, येथे अस्पायर एज्युकेशन फेअरचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी १0 वाजता करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह्यलोकमतह्णचे सहायक व्यवस्थापक रमेश डेडवाल, निवासी संपादक रवी टाले, मानव स्कूल ऑफ पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग अँन्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य प्रदीप खांदवे, मानव कल्याण चॅरिटेबल ट्रस्ट अकोलाचे मनोज महाजन, राठी पेपर ट्रेडर्स अकोलाचे आशिष राठी, सिंहगड इन्स्टिट्यूट पुणेचे रवी फडके, वार्सिटी श्री चैतन्यचे महेन्द्र पिल्ले, एम आय टी पुणेचे प्रोफेसर विनोद साल्वे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करून आदरणीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रदीप खांदवे यांनी मनोगत व्यक्त करीत अस्पायर एज्युकेशन फेअरला शुभेच्छा दिल्यात. प्रदर्शनाची वेळ दररोज सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत असेल. पालक असो वा पाल्य त्यांच्या मनात भावी शिक्षणाविषयीच्या अनेक शंका-कुशंका असतात. त्या प्रत्येक शंकांचे निरसन या प्रदर्शनात होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात आपणास मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरियर डिझाइनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अँनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लॅग्वेज, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिनाच उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. व्यावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे. कारण, एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिकरीत्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. या निमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडल्या जाणार आहे.