ग्रामीण भागात लसीकरणासाठी सोपी पद्धत राबवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST2021-05-12T04:19:16+5:302021-05-12T04:19:16+5:30

अकोला : केंद्र शासनाने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोविन ॲपद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. परंतु, ...

Simple method for vaccination in rural areas! | ग्रामीण भागात लसीकरणासाठी सोपी पद्धत राबवा!

ग्रामीण भागात लसीकरणासाठी सोपी पद्धत राबवा!

अकोला : केंद्र शासनाने १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोविन ॲपद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. परंतु, जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम व डोंगराळ भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे या वयोगटातील नागरिकांवर लसीकरणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता नोंदणीसाठी अत्यंत साधी सोपी व सुटसुटीत प्रक्रिया राबविण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोविन ॲपद्वारे नोंदणी करताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यामध्ये दुर्गम, अति दुर्गम व डोंगराळ भागाचे प्रमाण जास्त असून, या ठिकाणी मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोबाईलद्वारे नोंदणी करणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांकडे अत्याधुनिक मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नोंदणी करण्याचे ज्ञान नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब लक्षात घेता लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या उद्देशातून संबंधित नागरिकांचे केवळ आधार कार्ड घेऊन त्यांची नोंदणी करून घेण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेने स्वीकारल्यास लसीकरणाचा वेग वाढविण्यास मदत होणार असल्याची मागणी आ. देशमुख, उपजिल्हाप्रमुख तथा जि. प.तील गटनेता गोपाल दातकर, अनिरुद्ध देशमुख, शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

प्रत्येक केंद्रात पहिल्या व दुसऱ्या डोसची व्यवस्था करा!

आजरोजी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी या लसींचा पहिला डोस घेतला, त्यांना आता ताटकळत बसावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रत्येक केंद्रात पहिल्या व दुसऱ्या डोससाठी लसीच्या उपलब्धतेनुसार व्यवस्था करावी, तसे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे, अशी सूचना यावेळी आ. देशमुख यांनी केली.

Web Title: Simple method for vaccination in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.