सिमीच्या दहशतवाद्यास न्यायालयात केले हजर
By Admin | Updated: May 12, 2017 08:36 IST2017-05-12T08:36:36+5:302017-05-12T08:36:36+5:30
गुरुवारी दुपारी एटीस पथकाने अकोला न्यायालयात पेशीसाठी हजर केले.

सिमीच्या दहशतवाद्यास न्यायालयात केले हजर
अकोला: वर्षभरापूर्वी अकोला व औरंगाबाद दहशतवादविरोधी पथक (एटीएस) ने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून मोठ्या शिताफीने खंडवा येथील सिमी संघटनेचा दहशतवादी मोहम्मद खलील याला औरंगाबाद येथून अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी एटीस पथकाने अकोला न्यायालयात पेशीसाठी हजर केले. मोहम्मद खलील याच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
एका वर्षापूर्वी अकोला व औरंगाबाद एटीएसच्या पथकाने खंडवा येथील सिमी या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेला मोहम्मद खलील याला औरंगाबाद येथून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला नाशिक येथील कारागृहात पाठविले होते. आतापर्यंत मोहम्मद खलील हा नाशिक कारागृहात बंदिस्त आहे. त्याला अकोला न्यायालयात पेशीसाठी पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. यावेळी नाशिक पोलिसांसमवेत अकोला एटीएसचे कर्मचारी उपस्थित होते