आखातवाड्याच्या वृतिकाला रौप्यपदक

By Admin | Updated: September 3, 2015 23:53 IST2015-09-03T23:53:38+5:302015-09-03T23:53:38+5:30

४३ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर ज्युदो स्पर्धेत सुंदर खेळप्रदर्शन; अकोला जिल्ह्याला मिळवून दिले रौप्यपदक.

Silver Medal for Akhatwada Vritika | आखातवाड्याच्या वृतिकाला रौप्यपदक

आखातवाड्याच्या वृतिकाला रौप्यपदक

अकोला: आखातवाडा या छोट्या गावात कोणतीही प्राथमिक खेळसुविधा नसताना वृतिका रमेश ढगे हिने ४३ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर ज्युदो स्पर्धेत सुंदर खेळप्रदर्शन करीत अकोला जिलला रौप्यपदक मिळवून दिले. स्पर्धा महाराष्ट्र ज्युदो संघटनेंतर्गत अहमदनगर जिलतील नेवासा येथे झाली. वृतिकाने १५ वर्षाआतील गटात ३६ किलो वजनगटात प्रदर्शन केले. मागील पाच वर्षांपासून वृतिकाने विविध राज्यस्तर स्पर्धेत स्वबळावर पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय स्पर्धामध्येदेखील राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. वृतिका यंदा नवव्या वर्गात शिकत आहे. शालेय शिक्षण व क्रीडा राज्यमंत्री विनोद तावडे यांनी वृतिकाचे कौतुक केले. वृतिकाच्या यशाबद्दल रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रफुल शिरसाट, डॉ. गोपाल क्षीरसागर यांनी तिच्या आईवडिलांसह तिचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.

Web Title: Silver Medal for Akhatwada Vritika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.