साक्षरतेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ

By Admin | Updated: July 11, 2014 00:24 IST2014-07-11T00:24:47+5:302014-07-11T00:24:47+5:30

दहा वर्षांत पावणेदोन लाख वाढली जिल्ह्याची लोकसंख्या

Significant increase in literacy | साक्षरतेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ

साक्षरतेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ

अकोला : गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्ह्याची लोकसंख्या पावणेदोन लाखाने वाढली आहे. गत दहा वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात साक्षरतेच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. केंद्र सरकारमार्फत दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. त्यानुसार सन २00१ मध्ये अकोला जिल्ह्यात करण्यात आलेल्या जनगणनेनुसार १६ लाख ४१ हजार २५१ इतकी जिल्ह्याची लोकसंख्या होती. त्यामध्ये पुरुष ८ लाख ४१ हजार २५१ आणि ७ लाख ८८ हजार ९८६ स्त्रियांचा समावेश होता. तर ४ लाख ९४ हजार ९९४ स्त्री-पुरुष साक्षर होते. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच सन २0११ मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख १३ हजार ९0६ झाली. त्यामध्ये ९ लाख ३२ हजार ३३४ पुरुष आणि ८ लाख ८१ हजार ५७२ स्त्रिया असून, त्यापैकी १४ लाख ११ हजार २८१ साक्षर स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. २00१ मधील जनगणनेच्या तुलनेत २0११ मधील जनगणनेची ही आकडेवारी लक्षात घेता, गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्ह्यातील लोकसंख्येत १ लाख ८३ हजार ६६७ इतकी वाढ झाली असून, साक्षरतेच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Significant increase in literacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.