महागाईविरोधात स्वाक्षरी अभियान
By Admin | Updated: July 11, 2014 00:27 IST2014-07-11T00:27:15+5:302014-07-11T00:27:15+5:30
अकोला महानगर महिला काँग्रेसच्यावतीने गुरुवारी टॉवर चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

महागाईविरोधात स्वाक्षरी अभियान
अकोला : मोदी सरकारने जी महागाई वाढविली आहे, त्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे, असा आरोप करीत अकोला महानगर महिला काँग्रेसच्यावतीने गुरुवारी टॉवर चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ७00 नागरिकांनी स्वाक्षरी करून मोदी सरकाराचा निषेध वर्तविला.
मोदी सरकारने जे निर्णय घेतले, त्याच्या निषेधार्थ महानगर महिला काँग्रेसच्यावतीने टॉवर चौकात गुरुवारी सकाळपासूनच स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आले होते. स्टेट बँकेसमोर यासाठी मंडप टाकण्यात आला होता. शहरातील जवळपास ७00 नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला निषेध नोंदविला.
या उपक्रमाच्या आयोजनाप्रसंगी प्रदेश महिला काँग्रेसच्या निरीक्षक मिनल आंबेकर, प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिव डॉ. संजीवनी बिहाडे, महानगर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. स्वाती देशमुख, नगरसेविका उषा विरक, सुहासिनी गोयनका, वनिता राऊत यांच्यासह सुनीता धुरंधर, यशोदा गायकवाड, मनीषा हमीरानी, सुमल भालदाने, सिंधू भीमकर, पुष्पा देशमुख, जयश्री देशमुख, संगीता आत्राम, मंदा टेकाडे, नंदा मिश्रा, मंगला इंगळे, सुमित्रा निखाडे, पुनम चव्हाण, वंदना बोराखडे, सीमा ठाकरे, माधुरी काळबागे, आशा कोपेकर, आशा वानखडे, शोभा नायडू, आशा सिरसाट, विद्या सुखदेवे, प्रभा वरठे, सत्यभामा बांगर, शोभा पाटील, चंद्रकला सोमवंशी, कौशल्या पाटील, लक्ष्मी सिरसाट, रुख्मा इंगळे, वसुंधरा नंदागवळी, बेबी बोरखडे, रेणुका कापशीकर, इंदूमती कोगदे, कस्तुरी वानखडे, लक्ष्मी क्षीरसागर, दांदळे, लता पाटील, रुख्मा मेश्राम, चारूशीला मिश्रा आदींसह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.