खामगाव येथील सिध्दिविनायक

By Admin | Updated: September 3, 2014 20:59 IST2014-09-03T20:59:22+5:302014-09-03T20:59:40+5:30

खामगाव येथील श्री सिध्दीविनायक गणपती मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ख्याती.

Siddhivinayak of Khamgaon | खामगाव येथील सिध्दिविनायक

खामगाव येथील सिध्दिविनायक

खामगाव : स्थानिक सुटाळपुरा भागातील श्री सिध्दीविनायक गणपती मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ख्याती असून गणेशोत्सवदरम्यान मंदिरात भाविकांची गर्दी उसळते. सन १९0२ च्या दरम्यान शहरातील सौ.मुन्नीबाई श्रीचंदलाल खत्री ह्या माहेर शिवणी बनापुरा (मध्यप्रदेश) येथून येत अस ताना साक्षात्कारी संत दादाजी धुनीवाले (बडे दद्दा) यांनी सदर गणेशाची मूर्ती देऊन तिची स्थापना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे खत्री परिवाराने या गणेश मूर्तीची सुटाळपुरा भागात स्थापना केली. १९८0 पर्यंत या मंदिराची देखभाल खत्री परिवाराकडेच होती. त्यानंतर १९८५ पर्यंत मुकुंदराव टिपरे यांनी संस्थानचा कारभार पाहिला. बबनराव महाजन, विलास पाठक यांनी सदर मंदिराचे ट्रस्ट तयार केले. उपरोक्त ट्रस्टच्यावतीने मंदिराचा जिर्णोध्दार केला. त्यामध्ये श्रीराम अग्रवाल, स्व.मोहनसेठ अग्रवाल, नंदुभाऊ खत्री यांनी मोलाचे सहकार्य केले. मंदिर स्थापनेपासून आजपर्यंत सिध्दीविनायकाच्या जागृतपणाचे अनेक अनुभव भाविकांना आले असून मंदिर लहान असले तरी मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. विशेषत: गणेशोत्सवात मंदिर भक्तांसाठी नेहमी खुले ठेवण्यात येते.गणेशोत्सवासोबतच गोकुळाष्टमी, दर महिन्याची संकष्ट चतुर्थी, सहस्त्रावर्तन, गणेश जयंती आदी उत्सव साजरे होतात. १९९५ पासून सिध्दीविनायक ट्रस्टचा कारभार गणेश क्षीरसागर यांचेकडे होता. तर २00६ पासून रवींद्र गिरजापुरे यांचे मार्गदर्शनात विजय गुजराथी,महाजन गुरुजी, बबन माडिवाले, गणेश क्षीरसागर, सल्लागार विजय सोनोने, गजानन पिंगळे, रामसिंह बयस, सारंगधर चेंडाळणे, प्रमोद कस्तुरे, सचिन पाठक, अचल अग्रवाल, समाधान बोंडे आदी युवा कार्यकर्ते पाहत आहे.

Web Title: Siddhivinayak of Khamgaon