रेल्वे दरोड्यातील शुटर गजाआड

By Admin | Updated: September 3, 2014 01:18 IST2014-09-03T01:14:55+5:302014-09-03T01:18:27+5:30

अकोला येथील रेल्वे दरोड्यातील शुटर गजाआड; ४ सप्टेंबरपर्यंंत पोलिस कोठडीत रवानगी.

Shutter goosehead in the train dock | रेल्वे दरोड्यातील शुटर गजाआड

रेल्वे दरोड्यातील शुटर गजाआड

अकोला: रेल्वेतील दरोड्यासोबतच प्राणघातक हल्ल्यासारख्या गंभीर गुन्हय़ांमध्ये पोलिसांना हव्या असलेला शुटर सतीश प्रकाश गुडधे (१९) याला कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयाने ४ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
१६ ऑगस्टच्या मध्यरात्री पाच ते सहा दरोडेखोरांनी आदिलाबाद- अकोला रेल्वे पॅसेंजरवर दरोडा घातला होता. दरोडेखोरांनी प्रवाशांकडून २ लाख १0 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. या दरोड्यामध्ये सहभागी असलेला शुटर सतीश गुडधे हा फरार होता. त्याला कोतवालीचे एपीआय नंदकिशोर नागलकर आणि त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री गजाआड केले.

Web Title: Shutter goosehead in the train dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.